Download App

50 कुठं अन् 105 कुठं! हाच आमचा मोठेपणा; नाम ही काफी है म्हणत भाजपचा पलटवार

BJP News : शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या एका जाहिरातीवरून राज्याच्या राजकारणाचा पारा चढला आहे. पहिल्या जाहिरातील चूक लक्षात आल्यानंतर शिंदे गटाने फडणवीस यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात प्रसिद्ध केली. तरी देखील हा वाद निवळलेला नाही. विरोधकांनीही फडणवीस यांना सॉफ्ट कॉर्नर देत शिंदेंवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप कार्यकर्त्यांत पोस्टर वॉर सुरू झाले आहे.

शिवसेना-भाजप युतीला वर्ष होत नाही तोच युतीत संघर्षाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. भाजपने शिंदे पिता पुत्रांची ठाण्यातच कोंडी केली त्यानंतर पुढे काय होणार याच्या चर्चा सुरू असतानाच वर्तमानपत्रात एक जाहिरात आली. या जाहिरातीमुळे सेना भाजपातील संघर्ष अधिकच वाढला. राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात देत भाजपला डिवचण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फडणवीस यांच्यापेक्षा अधिक महत्व देण्यात आले.

इतकेच काय तर त्या जाहिरातीत फडणवीस यांचा फोटोही छापण्यात आला नाही. त्यामुळे ही जाहिरात भाजप नेत्यांच्या प्रचंड जिव्हारी लागली. भाजप नेते तर नाराजी व्यक्त करत आहेतच पण, आता हा वाद थेट रस्त्यावर येऊन ठेपला आहे.

भाजपकडून उल्हासनगरमध्ये देवेंद्र फडणवीस किंग मेकर असे होर्डिंग झळकले आहेत. हे होर्डिंग भाजपाचे माजी नगरसेवक प्रदीप रामचंदानी आणि कपिल अडसूळ यांनी लावले आहेत. उल्हासनगरमध्ये लावण्यात आलेल्या या होर्डिंगवर 50 कुठं आणि 105 कुठं? हा आमच्या भाजपचा मोठेपणा! देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है.. असा उल्लेख करत फडणवीसांच्या फोटोजवळ किंग मेकर शब्द लिहीले आहेत. भाजपने लावलेले हे होर्डिंग नव्या वादाला तोंड फोडणास अशी शक्यता व्यक्त होत आहे. यानंतर आता शिंदे गट काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

Tags

follow us