Eknath Shinde : राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. या संदर्भात पडद्यामागेही काही हालचाली घडत असल्याची चर्चा होत आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अचानक तीन दिवसांची रजा घेऊन साताऱ्याला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, त्यांचा या रजांचे असे कोणतेच नियोजन नव्हते. तरी देखील त्यांनी तीन दिवसांची रजा घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यात काही दिवसांपासून राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. सत्तासंघर्षावर न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून निकाल केव्हाही येण्याची शक्यता आहे. आमदार अपात्र ठरून सरकार कोसळणार का, असा प्रश्न तर आहेच. त्यातच आता भाजपने प्लान बी सुरू केल्याच्याही वावड्या उठल्या आहेत. यानुसार मुख्यमंत्री बदलाच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबरही भारतीय जनता पार्टीची जवळीक वाढल्याचे मागील काही घडामोडींवरून दिसून येत आहे.
Bhima Patas : राहुल कुल यांच्या अडचणी वाढणार?; मोदी अन् ED ला टॅग करत राऊतांची CBI कडे तक्रार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे यांचा तीन दिवसांच्या रजेचा कोणताच प्लॅन नव्हता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या, कर्मचाऱ्यांना या सुट्ट्यांबाबत माहिती दिली. राज्यात अनेक राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना मुख्यमंत्री शिंदे 24 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान त्यांच्या गावी सातारा येथे गेले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक रजा का घेतली, असा प्रश्न आता विचारला जात आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पडद्यामागे सुरू असलेल्या चर्चांमुळे शिंदे नाराज असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, शिंदे सध्या भाजपच्या अजेंड्यावरच काम करत असल्याचे दिसत होते.
मुख्यमंत्री विसर्जित होणार, हे नक्की; आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार, सामनातून टोलेबाजी
प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेले निर्णय, कोरोना काळातील मोदी सरकारची कामगिरी, काश्मिरातून कलम 370 हटवणे, अयोध्येत राम मंदिराची उभारणी तसेच मध्यंतरी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे निर्माण झालेला वाद, या सगळ्याच मुद्द्यांवर शिंदे यांनी सातत्याने भाजपची पाठराखण केली. त्यांचा अयोध्या दौराही प्रचंड गाजला. या दौऱ्यामागेही भाजपाच होता.
विधिमंडळ अधिवेशनात तर ते विरोधकांवर अक्षरशः तुटून पडले होते. अशा परिस्थितीत या ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत, त्या मुख्यमंत्री शिंदे यांना अपेक्षित नव्हत्या, असे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले.