Download App

एकनाथ शिंदे नाराज आहेत का ?; फडणवीस म्हणाले, संजय राऊतांना भेटलात का ?, वाचा काय घडलं..

Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit Pawar) पक्षाच्या आमदारांसह भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा होत्या. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पदावरून हटविण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आज शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर निघून गेल्याने ते नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. या घडामोडींवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्यातील घडामोडींबाबत प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, तुम्ही संजय राऊतांना भेटलात वाटतं अशा मोजक्याच शब्दांत उत्तर देत हा विषय त्यांनी संपवला.

भावी मुख्यमंत्री ! सासरवाडीत झळकले अजित पवारांचे बॅनर

एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत. त्यांच्या गावची जत्रा आहे. ते गावच्या जत्रेला गेले आहेत. जत्रेला गेल्यानंतरही ते नाराज आहेत असे कुणी म्हणत असेल तर त्याचा सत्कार त्या जत्रेत केला पाहिजे, असे सामंत म्हणाले होते.

कुणाची सुपारी घेऊन विरोध करता ?

दरम्यान, बारसू रिफायनरीला होत असलेल्या विरोधावर फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही जी रिफायनरी आहे त्यात केंद्र सरकारच्या तीन ऑइल कंपनी एकत्रित येऊन देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक करत आहेत. यामुळे जवळपास एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. मागच्या काळात नाणार येथे ही रिफायनरी करण्याचे ठरले होते. तेव्हा श्रीमान उद्धव ठाकरेंनी या गोष्टीला विरोध केला होता. त्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं उशिरा आलं पण आलं. त्यामुळे बारसूला रिफायनरी करा असं पत्र त्यांनी पाठवलं. आता पुन्हा तेच विरोध करत आहेत.

मानपानावरून वर पक्ष – वधू पक्षात जोरदार हाणामारी, १०-१२ जण हॉस्पिटलमध्ये भरती, पैठणमधील घटना

जे लोक आता विरोध करत आहेत त्यांना मला विचारायचं आहे की नेमकी कुणाची सुपारी घेऊन हा विरोध तुम्ही करत आहात. प्रकल्प बाहेर जातात म्हणून बोंब मारायची आणि प्रकल्प येत आहेत तेव्हा विरोध करायचा, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

Tags

follow us