Download App

‘पवार साहेबांचे डायलॉग सेम, त्यांची स्वप्नं कधीच पूर्ण होत नाहीत’; फडणवीसांचा खोचक टोला

Devendra Fadnavis replies Sharad Pawar : राज्यात आणि देशात भाजपविरोधी मोदीविरोधी वातावरण आहे. त्यामुळे 2024 मध्ये बदल होईल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या कामाची एकत्रित पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी पवार यांनी केलेल्या भाकितावर प्रत्युत्तर दिले.

‘डबल इंजिन सरकार बैलगाडीपेक्षा हळू; तेलपाणी करायला दिल्लीतील सर्व्हिसिंग स्टेशनला जावं लागते’

फडणवीस म्हणाले, ट्रेंड बदलण्याची स्वप्नं पवार साहेब वर्षानुवर्षे पाहत आहेत पण त्यांची स्वप्न कधी पूर्ण झाली नाहीत. 2014 ला पाहिली, 2019 ला पाहिली, लोकसभेतही पाहिली विधानसभेतही पाहिली. हे असेच डायलॉग 2014 मध्ये होते. 2019 मध्येही ते हेच बोलले. निवडणुका आल्या आता आम्हालाही पवार साहेबांची सवय झाली. निवडणुका आल्या की पवारसाहेबांचे डायलॉग काय असतील. देशभरात मोदी विरोधी वातावरण आहे अरे कुठंय 300 लोकं निवडून द्यायला लागले आहेत मोदींच्या नावावर आणि यांना मोदीविरोधी वातावरण दिसतंय. त्यामुळे हे सगळं चालत कारण निवडणुका जवळ आल्यात, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

पवार साहेब बोलतात त्याच्या नेमकं उलटं असतं – शिंदे 

त्यानंतर लागलीच मुख्यमंत्री शिंदे यांनीही मोजक्या शब्दांत टोलेबाजी केली. आतापर्यंतचा इतिहास तुम्हाला माहिती आहे पवार साहेब बोलतात त्याच्या नेमकं उलटं असतं, असेज म्हणत त्यांनी मोदी विरोधी वातावरण असल्याचं आता जे शरद पवार बोलत आहेत नेमकं त्याच्या उलट झालं तर याकडे लक्ष वेधले.

https://letsupp.com/politics/sujay-vikhe-speak-on-ram-shinde-54858.html

 

Tags

follow us