Download App

‘होय, मोदी जे बोलले ते 100 टक्के सत्यच’; शिंदे गटाच्या नेत्यानं फोडलं मोठं गुपित

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं होतं. एनडीए खासदारांच्या बैठकीत मोदींनी ठाकरे गटावर जोरदार प्रहार केले होते. त्यांच्या या टीकेवर प्रतिक्रिया येत आहेत. राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई (शिंदे गट) यांनीही भाष्य केले आहे.

पंतप्रधान मोदींचं वक्तव्य 100 टक्के खरे आहे. त्यावेळी शिवसेनेनं हटवादी भूमिका घेतली होती. अपेक्षेपेक्षा जास्त जागा मागण्यात आल्या. त्यामुळे भाजपबरोबर असलेली युती तुटली. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य शंभर टक्के सत्यच आहे, असे मंत्री देसाई म्हणाले.

हे होणार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान, भारतात होते उपउच्चायुक्त

मोदी काय म्हणाले होते?

महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली. शिवसेना-भाजपसोबत सत्तेत होती, पण त्यावेळी ‘सामना’तून माझ्यवर टीका केली जायची. कारण नसताना वाद निर्माण होत होते. मात्र आम्ही अनेक वेळा सहन केले. तुम्हाला सत्तेत पण राहायचे आहे आणि आमच्यावर टीका पण करायची आहे, या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील? असा सवालही पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत उपस्थित केला होता. तसेच पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या स्वार्थी राजकारणामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान होता आले नाही, असेही सांगितले.

खडसेंनीच फोन करून सांगितलं युती तुटली – राऊत

पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही जोरदार पलटवार केला होता. शिवसेनेनं युती तोडली, असं पंतप्रधान मोदी म्हणत असतील तर ते दिशाभूल करत आहेत. 2014 ची परिस्थिती पंतप्रधानांनी आठवायला हवी. 2014 साली युती कुणी आणि का तोडली हे संपूर्ण देशानं पाहिलं. त्यानंतर शिवसेनेने निवडणुका स्वतंत्र लढल्या. आपली युती तुटली, आपण वेगळे झालो असं भाजपतर्फे एकनाथ खडसे यांनीच उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेची साथ कुणी सोडली याचे जुने रेकॉर्ड पंतप्रधानांनी एकदा तपासून पहावेत, अस राऊत म्हणाले होते.

Tags

follow us