Download App

‘आधी पोलीस प्रशासनात दबदबा तर निर्माण करा’; अजितदादांनी टोचले फडणवीसांचे कान

Ajit Pawar News : ज्यांच्या हातात सरकार असतं त्यांनी प्रशासनावर जरब बसवला पाहिजे. पोलीस खातं ज्यांच्याकडे आहे त्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्या पोलीस खात्यात आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे. गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या अधिकारी वर्गाला प्रोत्साहन दिलं तरच गुन्हेगारी थांबू शकते, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी गृहमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले आहेत.

अजित पवार यांनी आज कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर त्यांनी फडणवीस यांना चांगलेच फैलावर घेतले.

कर्नाटकात दाखवून दिलं, आता महाराष्ट्रातही तेच घडेल; अजितदादांनी सरकारला सुनावलं

पवार म्हणाले, दंगली वाढतील असं दबक्या आवाजात बोललं जात आहे. ज्यांची चौकशी चालू आहे त्यांनी ईडीला किंवा त्या यंत्रणेला सहकार्य केलं पाहिजे आणि सरकारी यंत्रणेने सुद्धा द्वेष भावनेने, सूड भावनेने, राजकीय भावनेने त्या यंत्रणांचा वापर करू नये. सरकारकडून ज्या ज्या घोषणा केल्या जात आहेत त्यांची अंमलबजावणी मात्र होत नाही. विकासकामांना स्थगिती दिली जात आहे. शेतकऱ्यांच्या घरांपर्यंत कोणतीही मदत दिली जात नाही. त्यामुळे सरकारविरोधात जनतेत असंतोष निर्माण झाला आहे, असे पवार यांनी सांगितले.

अशा बातम्यांनी पेट्रोल दरवाढ कमी होईल का ?

अनेक नेते भाजपात जाणार असल्याचे दावे केले जात आहेत. असे दावे अनेक दिवसांपासून सुरू आहेत. ज्या वेळेस हे दावे खरे ठरतील त्यावेळेला याला महत्व असेल. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यांकडे दुर्लक्ष करण्यासाठीच असे दावे केले जात आहेत. अशा पद्धतीने बातम्या देऊन ते नेमके काय साध्य करतात हे मला अजूनही कळालेले नाही. अशा बातम्यांमुळे पेट्रोल दरवाढ कमी होणार आहे का, सिलिंडरच्या किंमती कमी होणार आहेत का, तरुणांना रोजगार मिळणार आहेत का, असे रोखठोक सवाल पवार यांनी केले.

Demonetization : “लहरी राजा अन् हवेतील निर्णय…” : मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात चढला राऊतांचा पारा

Tags

follow us