Sharad Pawar on Nitesh Rane : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला होता. त्यांनी केलेल्या या दाव्यावर राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी एकाच वाक्यात हा विषय संपवला.
पवार आज पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना नितेश राणे यांनी संजय राऊतांबाबत केलेल्या दाव्यावर प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी अगदी थोडक्यात प्रतिक्रिया देत हा विषयच संपवला. पवार म्हणाले, कुणीतरी सिरीयस बोलण्यात ज्यांचा लौकिक आहे अशा लोकांना उत्तर द्यावं. या पोरासोरांच्या वक्तव्यावर काय बोलणार.
‘हे तर महाराष्ट्राचे वैरी, बाळासाहेब असते तर’.. शिंदेंच्या कर्नाटक दौऱ्यावर राऊतांची आगपाखड
राणे काय म्हणाले ?
संजय राऊत हे येत्या 10 जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. त्यांच्या बैठका झाल्या असून त्यासंदर्भात बोलणीही सुरू आहेत. राऊत यांची शरद पवारांच्या राजीनाम्या वेळची भूमिका पाहिली किंवा त्याआधीची भूमिका पाहा ते त्यावेळी अजित पवारांवर टीका करत होते. अजित पवारांनी पक्ष सोडला तर मी लगेच पक्षात प्रवेश करतो असे राऊत पवारांना म्हणाल्याचे राणे यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी शरद पवार यांना आता शिवसेनेचे काही खरे नाही. उद्धव ठाकरेंचेही काही खरे नाही. तेव्हा मला तुमच्या पक्षात घ्या, असे सांगितले आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपात प्रवेश करतील असे राणे म्हणाले.
तुम्ही फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्या; भुजबळांनी राज ठाकरेंना फटकारले !
राणे पुढे म्हणाले, आम्ही बाळासाहेबांना नेहमीच सांगत होतो की संजय राऊत हा साप आहे. तो ना बाळासाहेब ठाकरेंचा होऊ शकला ना तुमचा होणार. उद्या ज्यावेळी संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करतील तेव्हा उद्धव ठाकरेंना त्यांचे इरादे समजतील. या एका माणसामुळं तुम्ही किती लोकांनी तोडलंत, असा सवाल राणे यांनी केला.