शिंदे गटाच्या उपनेत्या तथा प्रवक्त्या शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठे वादळ उठले होते. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या काही निकटवर्तीयांना पोलिसांनी अटक केली होती. आता ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जाणारे साईनाथ दुर्गे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. या व्हायरल व्हिडीओशी माझा कोणताही संबंध नाही असे दुर्गे यांनी म्हटले आहे.
Vijay Shivtare : फुरसुंगी आणि उरुळी गावाला पाच वर्षात काय मिळालं? मुख्यमंत्र्यांचा निर्णय महत्वपूर्ण
शीतल म्हात्रे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. यामध्ये आदित्य ठाकरे यांचे मित्र साईनाथ दुर्गे यांचाही समावेश होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी दुर्गे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली.
दुर्गे म्हणाले, ‘शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओशी माझा कोणताही संबंध नाही. व्हायरल व्हिडिओ समोर आला तेव्हा मी मुंबईत नव्हतो. मी त्यावेळी 11 तारखेला बंगळुरूत बहिणीकडे गेलो होतो. त्यानंतर 13 तारखेला मी परत आलो होतो. त्यामुळे या व्हिडीओशी माधा काहीच संबंध नाही.’
‘मी हा व्हिडीओ कुठेही शेअर पण केला नव्हता. असे असताना पोलिसांनी मला चौकशीसाठी नेले आणि अटक केली. कदाचित मी ठाकरेंच्या कोअर कमिटीत आहे त्यामुळे हे घडले का हे मात्र मला माहिती नाही,’ असेही त्यांनी सांगितले.