Download App

अनिल देशमुखांना सगळंच माहित होतं; ‘त्या’ गौप्यस्फोटावर राऊतही बोलले

Sanjay Raut Comment on Anil Deshmukh’s Statement : मी दोन वर्षांपूर्वी जर भाजपा (BJP) प्रवेशाची ऑफर स्वीकारली असती तर महाविकास आघाडी सरकार दोन वर्षांआधीच कोसळलं असतं, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत म्हणाले, अनिल देशमुख जे सांगत आहेत ते खरं आहे. मला संपूर्ण प्रकरण माहिती आहे. देशमुखांवर कोणत्या प्रकारचा दबाव होता आणि त्यांना भाजपने काय ऑफर दिली होती त्याचे पुरावे अनिल देशमुखांकडे आहेत. इतकंच नाही तर त्याबाबतचे काही व्हिडीओ सुद्धा त्यांच्याकडे आहेत. त्यांना कोण भेटलं, कुणी ऑफर दिल्या त्यांच्याबरोबर कोण काय बोललं कोणत्या सह्या घेऊ इच्छित होतं ही सगळी माहिती त्यांच्याकडे होती, असे राऊत म्हणाले.

आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; 2 दिवसांपूर्वीच घेतली होती फडणवीस-बावनकुळेंची भेट

याआधी देशमुळे म्हणाले होते, की दोन वर्षांपूर्वी माझ्याकडे काही प्रस्ताव आले होते. मी जर तडजोड केली असती तर माझ्यावर कारवाई झाली नसती. पण दोन वर्षांपूर्वीच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं असतं. मी सगळा त्रास सहन केला. मी कोणत्याही पद्धतीने कुणावर खोटे आरोप करणार नाही. मी कोणतीही तडजोड करायला नकार दिला. त्यामुळे मला सगळं भोगावं लागलं, असे देशमुख यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला सांगितले.

दरम्यान, काँग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांनी आज महाविकास आघाडी लवकरच तुटणार असून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येतील असा खळबळजनका दावा केला आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. जर हा निर्णय घेतला गेला तर त्या आमदारांचे राजकारणच बाद होण्याची शक्यता आहे. त्यांना सहा वर्षे अपात्रतेची कारवाई सहन करावी लागेल. मात्र, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे तशी वेळच येऊ देणार नाहीत, असे देशमुख म्हणाले.

Tags

follow us