Download App

‘देशाला स्वातंत्र्य मिळालं पण… शिंदे गटाच्या नेत्याचा भिडेंना ‘असा’ही पाठिंबा

Maharashtra Politics : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) गुरुजी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेडने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे मात्र भिडे गुरुजींच्या वक्तव्याचे समर्थनही होत आहे. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी भिडे गुरुजींच्या वक्तव्यावर वेगळे मत व्यक्त केले आहे.

जाधव यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, संपूर्ण हिंदुस्थानमध्ये फाळणी होऊन हिंदुस्थानमधून पाकिस्तान वेगळे करण्यात आले. 14 ऑगस्टला पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले आणि 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, अखंड हिंदुस्थानला स्वतंत्र मिळाले नाही.

पंकजा मुंडेंचं भविष्य रामदास आठवलेंनी सांगितलं; BRS प्रवेशाच्या चर्चांवर म्हणाले…

भारताच्या राज्यघटनेने राष्ट्रध्वज स्वीकारला आहे. आज तो आपला राष्ट्रध्वज आहे आणि तो आपला राष्ट्रध्वज असल्याने सगळ्यांनीच त्याचा सन्मान करणं हा खऱ्या अर्थानं देशाभिमान आहे. राष्ट्रध्वजाबद्दल कोणाचे काही मते असतील तर त्यांनी रीतसर मार्गानं मांडावीत. पण आज आपण राष्ट्रध्वजाला मानतो त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे असे जाधव म्हणाले.

काय म्हणाले होते संभाजी भिडे?

15 ऑगस्ट हा भारताचा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे या दिवशी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा, असे सांगून त्यांनी तिरंग्याच्या हिरवा आणि पांढऱ्या रंगावरवरही आक्षेप घेतला. जन, गण, मन हे पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी टागोरांना सुचलं होतं. काय लायकीचे लोकं, काय लायकीचं स्वातंत्र्य अन् काय झेंडावंदन असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करीत 1947 मध्ये मिळालेलं ते हांडगं स्वातंत्र्य असून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मानू पण फक्त दखलपात्र म्हणून, असं ते म्हणाले होते.

Tags

follow us