Download App

जिरेटोप वाद : चहुबाजूंनी टीकेची झोड उठताच अजितदादांचा शिलेदार ‘नरमला’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसीत जिरेटोप घालून स्वागत केले. यानंतर महाराष्ट्रात मात्र संतापाची लाट उसळली.

Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसीत जिरेटोप घालून स्वागत केले. यानंतर महाराष्ट्रात मात्र संतापाची लाट उसळली. विरोधी पक्षांच्या नेत्यांसह शिवप्रेमी नागरिकांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर कडाडून टीका केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केल्यानंतर प्रफुल्ल पटेल नरमले आहेत. यापुढे नक्कीच काळजी घेऊ अशी ग्वाही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रफुल्ल भाई लाचारी किती करावी. तुम्ही त्यांना टोप्या घाला. दुसऱ्या कोणत्याही घाला. पण, महाराजांचा जिरेटोप त्यांच्या डोक्यावर ठेवताय, ते डोकं कसं आहे ते तपासा अशा शब्दांत प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली होती. तसेच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पटेल यांच्यावर टीका केली होती. सर्वसामान्य नागरिकांनीही पटेल यांच्यावर टीका केली.

हेविवेट नेत्यांचा प्रचार, सोबतीला प्रफुल्ल पटेल… तरीही भाजपला भंडारा-गोंदिया जड का वाटू लागलयं?

यानंतर प्रफुल पटेल यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट लिहीली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यापुढे काळजी घेऊ.. असे पटेल यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पटेलांनी मोदींना दिला जिरेटोप

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून उमेदवारी करत आहेत. काल मोदींनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी एनडीएतील घटकपक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप भेट म्हणून दिला. याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पटेल यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली.

follow us