Download App

‘बारसू’वर आंबेडकरांचा संताप ! म्हणाले, आपले सत्ताधारी केंद्रातून फोन आल्यावर..

Prakash Ambedkar on Barsu Refinery : कोकणातल्या बारसू रिफायनरी (Barsu Refinery Project) प्रकल्पावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन तीव्र झाले आहे. राजकीय प्रतिक्रियाही येत आहेत. सत्ताधारी प्रकल्पाचे समर्थन करत आहेत. तर विरोधकांकडून कडाडून विरोध केला जात आहे. या मुद्द्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही या प्रकल्पाला विरोध केला आहे.

आंबेडकर यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इतकंच सांगतो की कोकणाची वाट लावू नका. बारसू रिफायनरीला आमचा विरोध आहे. याआधीच्या एन्रॉन प्रकल्पालाही आमचा विरोध होता.

राष्ट्रवादीने इतकी वर्ष जनतेला फसवलं; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

ते पुढे म्हणाले, राज्यातील नेते केंद्रातून फोन आल्यानंतर आपल्या भूमिका बदलतात. नंतर म्हणतात आमची ही भूमिका नाही. मुळात कोकण हे लाइफ सेंटर आहे. येथे मिळणारा ऑक्सिजन हा शंभर टक्के शुद्ध आहे. सत्ताधारी म्हणतात की येथे रोजगार वाढतील. मात्र, त्यापेक्षा जर येथील नैसर्गिक संपत्तीचे व्यवस्थित नियोजन केले तर येथे लोकांचा व्यापार वाढेल. त्यावर चालणारे उद्योगही वाढतील, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आढावा, ‘आग्र्यात आंतरराष्ट्रीय केंद्र उभारणार’

दरम्यान, या प्रकल्पावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सरकावर टीका केली होती. ते म्हणाले, तेथील 70 टक्के लोक आमच्या बाजूने आहेत. कसला सर्वे केला? लोक इथं मरण्यासाठी रस्त्यावर का उतरले आहेत? समन्वय कोणाशीच या सरकारमध्ये समन्वय नाही.

Tags

follow us