Download App

‘अजितदादा सोबत आले अन् माझं खातं… महाजनांनी सांगितलं खातेवाटपाचं सत्य

Girish Mahajan on Ajit Pawar : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीतील दोन्ही गटांकडून सभांचा धडाका लावण्यात आला आहे. आतापर्यंत एकमेकांविरोधात बोलताना सावध भूमिका घेणारे नेते आता उघडपणे टीका करू लागले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या एन्ट्रीने शिंदे गटातील नेत्यांची खदखद वाढत चालली आहे. अजित पवार गटातील आमदारांना खातेवाटप करताना सरकारमधील काही विद्यमान मंत्र्यांकडील खात्यांमध्ये अदलाबदल करण्यात आली. यावरुनही भाजपमधील मंत्रीही नाराज असल्याच बोलले जात होते. आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ही नाराजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच बोलून दाखवल्याने राजकारणात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, गिरीश महाजन, राज्यपाल रमेश बैस आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात महाजन यांच्या वक्तव्याचीच जास्त चर्चा रंगली होती.

अजित पवार (Ajit Pawar) आमच्यासोबत आले आणि माझं क्रीडा खातं काढून घेण्यात आलं. आता ते का काढून घेतलं. ते मला आणि अजितदादांनाच माहिती. ते मी इथं सांगणार नाही, असे मंत्री महाजन (Giriah Mahajan) म्हणाले. आता त्यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. महाजन खरेच नाराज आहेत का, या वक्तव्याच्या माध्यमातून त्यांना नेमके काय साधायचे होते असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या कार्यक्रमात कुस्तीपटू खाशाबा जाधव(Khashaba Jadhav) यांचा जन्मदिन 15 जानेवारी ‘राज्यक्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी केली. खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देत जगात भारताची मान उंचावली. त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राचाही गौरव वाढला, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा : Shirdi LokSabha : बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे; ठाकरेंसमोर आणखी एक मोठा पेच

                      कोपरगाव मतदारसंघ राष्ट्रवादीचाच, आमदार काळेंच्या दाव्याने कोल्हेंसमोर पेच

Tags

follow us