Pune News : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट (Pune News) करण्यात आलेल्या 34 गावांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.11 मार्च) समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याने निवडणुकीआधीच महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकप्रकारे बोनसच मिळाल्याच बोललं जात आहे. या समितीमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 18 कार्यकर्त्यांमध्ये (लोकप्रतिनिधी) शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले आहे. यामध्येही बहुतांश कार्यकर्ते हे खडकवासला मतदारसंघातील असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नवीन समाविष्ट करण्यात आलेली ही गावे महापालिकेत आली होती. मात्र तेथे महापालिका निवडणुका न झाल्याने या गावांना लोकप्रतिनिधित्व नव्हते. आता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे या सदस्यांच्या मार्फत कामे सुचवण्यात येतील. यातील बरीच गावे खडकवासला विधानसभा मतदारसंघात आहेत. खडकवासल्याचा समावेश बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये (Baramati Lok Sabha Constituency) होत असल्याने या समितीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना बळ देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतल्याचे बोलले जात आहे.
Pune Lok Sabha : ‘आता ना तक्रार, ना कुणाकडून अपेक्षा’; वसंत मोरेंच्या पोस्टने पुन्हा खळबळ!
नियुक्ती करण्यात आलेले सदस्य आणि गाव
अमर राजू पूले-मांजरी बुद्रुक, उल्हास तुपे-साडेसतरा नळी, बाळासाहेब रामदास चांधेरे- सुसगाव, सुनील अमन खांदवे-लोहगाव, सचिन विष्णु दांगट- शिवनेगाव, अश्विनी किशोर पोकळे- धायरी गाव, स्वाती अनंता टाकळे-बावधन, पियुषा किरण दगडे-उंड्री, राकेश मारूती झांबरे-होळकरवाडी, श्रीकांत मारूती लिपाने-आंबेगाव खुर्द, मच्छिंद्र काळूराम दगडे-पिसोळी, संदीप सोमनाथ सातव-वाघोली, बाळासाहेब वसंत धुले-मांजरी बुद्रुक, भूषण माऊली तुपे-साडेसतरा नळी, वंदना महादेव कोंद्रे-केशवनगर, राजेंद्र काशिनाथ भिताडे -उंड्री, स्नेहल गणपत दगडे, पिसोळी.