Maharashtra Rain Alert : ऑगस्ट महिन्यात ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. आज राज्यातील काही भागात विजांसह मुसळधार पावसाची देखील शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात पावसाचा पुनरागमन होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यानंतर राज्यात कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता मात्र आता हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी समोर येत आहे.
हवामान विभागाने (Maharashtra Rain Alert) दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नंदूबार, धुळे, जालना, हिंगोली आणि नांदेड (Nanded) जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण देखील राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी उन आणि सावलीचा खेळ सुरु असणार असून या ठिकाणी हलक्या सरी पडणार असल्याची देखील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागानुसार, नंदूरबार, धुळे, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
आज चार राशींसाठी होणार आर्थिक लाभ, व्यवसायातही मिळणार यश-
मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने सद्या राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे असं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि तेलंगणा राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे.
