Maharashtra Rain Alert : मोंथा चक्रीवादळामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. तर दुसरीकडे आता पुन्हा एकदा राज्यात आस्मानी संकट येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील 4 ते 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने (Maharashtra Rain Alert) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागत पुढील 4 ते 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज रत्नागिरी (Ratnagiri) , सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये आज वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
तर पुढील दोन दिवसांनंतर राज्यात तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने राज्यात आता गारठा वाढण्याची देखील शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री अमृता खानविलकरचा एअरपोर्ट लूक व्हायरल
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर अंदमान समुद्रात पृष्ठभागावरील वारे ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगाने आणि वारे ताशी 55 किलोमीटर वेगाने वाहतील. तर 6 नोव्हेंबर रोजी उत्तर, मध्य आणि दक्षिण अंदमान तसेच निकोबारमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह वादळ सुरु राहण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
Lagali Paij : “लागली पैज?” नाटकातून रुमानी खरे आणि यशोमन आपटे झळकणार एकत्र
