Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा धो धो…, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert :  अर्नब चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यांसह महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे.

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert :  अर्नब चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यांसह महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. अचानक बदलेल्या हवामानामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. मुंबई, अहिल्यानगर, पुणेसह इतर शहरांमध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे अर्नब चक्रीवादळामुळे राज्यात हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अर्नब चक्रीवादळामुळे (Cyclone Arnab) मुंबई (Mumbai Rain) , विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. यापैकी अनेक ठिकाणी रात्रीपासूनच (Maharashtra Rain Alert) पावसाला सुरुवात झाली आहे. माहितीनुसार, अहिल्यानगर, सातारा, पुणे (Pune), कोल्हापूर, सांगली आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर आज देखील वादळी वाऱ्यांसह या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

तर दुसरीकडे राज्यातील इतर भागात ढगाळ वातावरण असणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. चक्रीवादळ अर्नबने 28 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडक दिली. हे अतितीव्र (Very Severe) चक्रीवादळ म्हणून किनाऱ्यावर पोहोचले. वादळाच्या वेळी 125–135 किमी प्रतितास वेगाचे वारे नोंदवला गेले. या चक्रीवादळाचा परिणाम आंध्र प्रदेश, ओडिशा आणि आसपासच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला असून मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि पूरस्थितीचा धोका निर्माण झाला.

चंद्र राहूच्या नक्षत्रात, आज ‘या’ तीन राशींच्या लोकांना होणार धनलाभ-

आंध्र प्रदेश आणि ओडिशामधून मिळून 1.80 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version