Download App

पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम, हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यभरात मान्सूनने जोर पकडल्याने अनेक भागांत रस्ते जलमय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने (IMD) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात येलो अलर्ट (Rain Alert) तर पुणे, सातारा आणि रायगड घाट विभागात ऑरेंज अलर्ट जाहीर केला (Maharashtra Rain Update) आहे. राज्याच्या बहुतांश भागांत शनिवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ येथे विशेषतः मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जळगावमध्ये पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले असून, वाहतूक ठप्प होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सांगली, गोंदिया, सातारा या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार उपस्थिती जाणवत आहे. काल अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट (Heavy Rain) दिला होता. आजही मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संसदेत दमदार कामगिरी, दिल्लीच्या मंचावर महाराष्ट्राचं वर्चस्व! 7 खासदारांचा सन्मान

धरणांमध्ये पाणीसाठा वाढला

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही प्रमुख धरणांमध्ये सध्या 87 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. घाटमाथ्यावर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण भरू लागले असून, येत्या काही दिवसांत ही धरणे पूर्ण क्षमतेने भरू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार असल्याने तिथे ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे.

मराठवाड्यालाही दिलासा

अनेक दिवसांपासून पावसाने दूर गेलेल्या मराठवाड्यातही आता काहीशी दिलासादायक स्थिती दिसू लागली आहे. जालना जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला, ज्यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा झाला आणि शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.

अजितदादांना विनाश काली विपरित बुद्धी, त्या सरमाड्याला… मुंडेंच्या वापसीवर जरांगे भडकले

ऑरेंज अलर्ट : रायगड, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा

यलो अलर्ट : मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा : वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ

 

follow us