Download App

सावधान! आज ‘या’ १० जिल्ह्यांत अवकाळी बरसणार; हवामान विभागाचा अलर्ट जारी

आजही राज्यातील दहा जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Maharashtra Rain Update : बंगालच्या उपसागरात धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाचा तडाखा (Fengal Cyclone) दक्षिणेतील राज्यांना बसला आहे. कर्नाटकच्या सागरी भागासह पू्र्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही (Maharashtra Rain Update) दिसला. राज्यातील अनेक जिल्ह्यांत ढगाळ हवामान तयार झाले आहे. काही जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. आजही राज्यात आज 10 जिल्ह्यांत अवकाळी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. फेंगल चक्रीवादळाचा परिणामामुळे काही जिल्ह्यांत पाऊस झाला.

तीन दिवस सावधान, या भागात मुसळधार पाऊस अन् 75 किलोमीटर वेगाने वारे, अलर्ट जारी

राज्यात आज अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता आहे. रविवारपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत आज वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

फेंगल वादळाचा परिणाम राज्यात काही ठिकाणी दिसून आला. नगर, पुणे जिल्ह्यांत काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने थंडी नाहीशी झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांना मात्र या बदललेल्या हवामानाचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत वाढ झाली आहे. गहू पीक मोठ्या संकटात सापडलं आहे. गव्हाला जास्त थंडीची आवश्यकता असते. मात्र सध्या थंडी कमी झाली आहे. त्यामुळे गव्हाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता दिसून येत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान राहिल. दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस (Heavy Rain) होईल असा अंदाज आहे.

Fengal Cyclone : सावधान, फेंगल चक्रीवादळ येत आहे, 13 उड्डाणे रद्द, रेड अलर्ट जारी

follow us