Download App

देशाला लुटणाऱ्या अदानीला का वाचवता ? ; राऊतांचा पंतप्रधान मोदींना सवाल

Sanjay Raut : देशात सध्या विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलने होऊच द्यायची नाहीत असा सरकारचा प्रयत्न आहे. देशात सध्या बदल्यांचे राजकारण सुरुच आहे. बदला घेण्यासाठी ते देश लुटणाऱ्या गौतम अदानीच्या पाठीमागे मोदी का उभे आहेत ?, याचे उत्तर त्यांनी द्यावे.

मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतरच या गौतम अदानीचा (Gautam Adani) उदय झाला, असा घणाघाती आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे फडणवीस सरकारसह थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले, ‘या देशाची ताकद प्रचंड आहे. विरोधी पक्षाचीही ताकद मोठी आहे. सत्ताधाऱ्यांना देश गुलाम करून आम्हाला बंधनात जखडून टाकायचे आहे. पण, आता ही बंधने तोडण्याची वेळ आली आहे. आंदोलने होऊच द्यायची नाहीत हा सरकारचा प्रयत्न आहे,’ असा आरोप त्यांनी केला.

मुंबईत पाणीकपात, जलबोगद्याच्या दुरुस्तीवर, जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं 

‘सरकार लोकशाही मार्गाने निवडून आले असले तरी निवडणुका हे भ्रष्ट मार्गाने जिंकले का हा प्रश्न आहे. त्याचे कारण म्हणजे, जनता ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरत आहे त्यावरून असे दिसते की लोकांनी यांना मतदान केलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इव्हीएम बाबतीत जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावर आता पुढे जाण्याची गरज आहे.’

Maharashtra Politics: तानाजी सावंतांच्या ‘त्या’ विधानावर राजकीय वर्तुळात चर्चा!

‘देशाला लुटणाऱ्या अदानीला मोदी का वाचवत आहेत हा खरा प्रश्न आहे. याबाबतीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत केलेले भाषण पुरेसे बोलके आहे. ते म्हणतात, की अदानी हा फक्त चेहरा आहे. अदानींकडचे सगळे पैसे हे मोदींचे आहेत त्याचा तपास व्हायला हवा.’

‘अदानींकडील पैसे मोदींचे आहेत म्हणून मोदी अदानींना वाचवत आहेत. यात ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना कोण कुणाशी वागले याचा प्रश्न येतोच कुठे किंबहुना ते मुख्यमंत्री असल्यापासूनच अदानींचा उदय झालेला आहे. देशात हजारो कोटींचा घोटाळा सुरू असतानाही पंतप्रधान मोदी त्यावर बोलण्याऐवजी विरोधकांशी संघर्ष करत आहेत’, राऊत म्हणाले.

 

Tags

follow us