Download App

धमकीनंतर संजय राऊत बोलले; म्हणाले, गद्दार गटाच्या आमदारांसाठी…

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर पोलिसांकडून तत्काळ हालचाली करण्यात आल्या. त्यानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत यांनीही या धमकीवर प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी या धमकी प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली.

 संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यामध्ये एके ४७ ने हत्या करण्याची धमकी देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास हा मेसेज आला असून त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.

Sanjay Raut Death Threat: मोठी बातमी! संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी!

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून हा धमकीचा मेसेज आला असल्याचे त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Musevala) प्रमाणेच दिल्लीत संजय राऊतांचीही हत्या करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या धमकीवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, अशा धमक्या येत असतात. पण विरोधकांना आलेल्या धमक्या आताचे सरकार गांभीर्याने घेत नाही. सगळी सुरक्षा व्यवस्था गद्दार गटाचे आमदार खासदार पदाधिकारी यांच्यासाठी लावल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढेपाळली आहे.

Vijay Shivtare : ते मिडीयापुरतेच मर्यादीत त्यांना बाष्कळ गप्पांची सवय, संजय जगतापांची शिवतारेंवर टीका

मला कळलंय की सलमान खानला ज्यांनी धमकी दिली त्याच गँगच्य माध्यमातून धमकी आली आहे. त्यातल्या काहींना पकडलंय असेही समजले आहे. असं झालं असेल तर त्यासाठी पोलिसांचा आभारी आहे असे राऊत म्हणाले.

Tags

follow us