Download App

‘भाजपने कोर्टात जावेच, मीही वाटच बघतोय’; बावनकुळेंच्या इशाऱ्यानंतर राऊतांचं चॅलेंज!

Sanjay Raut : सामनाच्या अग्रलेखातून आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आल्याने भाजपाचे नेते कमालीचे संतापले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही कठोर शब्दांत ठाकरे गटाचा समाचार घेतला. तसेच सामना वृत्तपत्राच्या विरोधात तक्रार करणार आणि न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला होता. यावर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत यांनी भाजपला खुले आव्हान दिले आहे. भाजपने कोर्टात जावे, मी वाटच बघतोय असे प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे हा वाद आणखीच वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बावनकुळे यांना म्हणावं की, खुशाल कोर्टात जा, मी वकिल देतो, त्यांचं वाचन कमी आहे. माझा त्यांना सल्ला आहे की, वाचाल तर वाचाल. त्यात जर उपमुख्यमंत्र्यांना उप म्हटलं तर गैर काय? असा सवाल राऊत यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसे जपानला गेले तसे त्यांनी चीनला जावं, लडाखला जावं, तिथली परिस्थिती समजून घ्यावी, हे फडणवीस यांचं डिमोशन आहे.

अग्रलेखात काय होतं ?

देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते. पण, ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली आणि ते अहंकाराचे महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले आहे.

‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने अस्वस्थता; फडणवीस, सांभाळा! सामनातून टीकेचे बाण

अशा परिस्थितीत त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजलेच नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ ची नशा ही देशी बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी देशी स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांड्या जात आहेत, फडणवीस सांभाळा ! असे टीकेचे बाण या लेखातून सोडले आहेत.

बावनकुळे काय म्हणाले होते ?

सामना वृत्तपत्राविरोधात आमचे मुंबईचे नेते आणि कार्यकर्ते लढा देणार आहेत.सामना वृत्तपत्राची आम्ही तक्रार करणार आहोत. यातून आंदोलनाची स्थिती निर्माण होऊ शकते. सामना ज्या पद्धतीने आग ओकत आहे ती आग आता थांबवावीच लागणार आहे. वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिलं आहे पण ते जर नियमाच्या बाहेर जाऊन काहीही लिहायला लागले तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला होता.

Chandrashekhar Bavankule : खुर्चीसाठी हिंदुत्व पायदळी तुडवणारे ठाकरे खरे गद्दार; बावनकुळेंचा पलटवार

Tags

follow us