Download App

काँग्रेसचा मतदारसंघांवर दावा, राऊतांनी थेट जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगून टाकला

Sanjay Raut : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारणाची गणितेच बदलली आहेत. अजितदादा आता  महाविकास आघाडीत नाहीत. त्यामुळे काँग्रेस वरचढ झाल्याचे दिसत होते. काँग्रेस नेते मतदारसंघांवर परस्पर दावा करत सुटले असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर थेट जागावाटपाचा फॉर्म्युलाच जाहीर करून टाकला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच आगामी निवडणुकांसदर्भातही भाष्य केले. मविआमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. जिंकेल त्याची जागा आमच्या आघाडीचे सूत्र आहे. गुरुवारी मातोश्रीवरील बैठकीत काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह इतर काँग्रेस नेते, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित असताना काही मुद्द्यांवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली, असे राऊत म्हणाले.

राजू शेट्टींना शरद पवारांचा भरवसाच नाही; म्हणाले, मला त्यांच्याबाबत..

ते पुढे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी मजबूत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आघाडी एकत्रच लढणार आहे. तीन पक्ष एकत्र असल्याने काही तडजोडी कराव्या लागतील. त्यासाठी आमची तयारी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी ठरवले आहे की जागावाटपावरून कुठेही मतभेद उघड करायचे नाहीत. जागेचा हट्ट धरायचा नाही, जिंकेल त्याची जागा हे सूत्र ठरलेलं आहे, असे राऊत म्हणाले.

.. म्हणून सरकारने निवडणूक स्थगित केली

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक अचानक रद्द करण्यात आली. या प्रकारावर संताप व्यक्त करत राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. निवडणूक रद्द झाली. यात धक्का बसण्यासारखं काहीच नाही. हा सरळसरळ भीतीपोटी घेतलेला निर्णय आहे. राज्य सरकार कोणत्याच निवडणुका घ्यायला तयार नाही. या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील पॅनलच विजयी होणार होता. त्याचीच भीती सरकारला वाटत होती. त्यामुळेच निवडणूक स्थगित करण्यात आली, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

सर्व्हे कशाला, महाविकास आघाडीच फुटणार; निवडणुकांआधीच शिरसाटांनी उडविली खळबळ!

Tags

follow us