Download App

SSC 10th Result 2024: दहावीत मुलीच हुशार! राज्याचा निकाल 95.81 टक्के, कोकण विभाग ठरला अव्वल

MSBSHSE Exam Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा (10th Exam Result 2024) निकाल जाहीर झाला असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

SSC 10th Result 2024 :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Board SSC Result) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून, (SSC 10th Result 2024 ) दहावीचा यंदाचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे.

निकालाची ठळक वैशिष्ट्ये
01.या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,60,154 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,49,326 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,84,441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 95.81 आहे.

02. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 25,770 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 25,327 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 12,958 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 51.16 आहे.

03. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 25,894 खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 25,368 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 20,403 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 80.42 आहे.

04. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 9149 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9078 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 8465 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 93.25 आहे.

05. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, पुनर्परिक्षार्थी व खाजगी मिळून एकूण 16,11,818 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 16,00,021 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 15,17,802 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.86 आहे.

बारावीत मुलीच हुशार! राज्याचा निकाल ९३.३७ टक्के, कोकण विभाग ठरला अव्वल

06. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (99.01) टक्के सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (94.73) टक्के आहे.

07. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 97.21 असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.56 आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 2.65 ने जास्त आहे.

08. एकूण 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

09. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 5,58,021 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 5,31,822 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 3,14,866 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 79,732 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

10. राज्यातील 23,288 माध्यमिक शाळांतून 15,60,154 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9,382 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर आज दुपारी 1 वाजल्यानंतर ऑनलाईन बघता येणार आहे.

निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेतून निकालासंदर्भातील ठळक माहिती देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2023 -2024 मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना एक वाजल्यापासून निकाल पाहता येतील, तसेच, निकालाची प्रत विद्यार्थी डाऊनलोड देखील करू शकणार आहेत.

पुणे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट! ब्लड रिपोर्टमध्ये अदलाबदल करून फॉरेन्सिक लॅबला पाठवले; आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

विभागनिहाय निकाल (टक्केवारी)

पुणे : 96.44 टक्के

नागपूर : 94.73 टक्के

छत्रपती संभाजीनगर : 95.19 टक्के

मुंबई : 95.83 टक्के

कोल्हापूर : 97.45 टक्के

अमरावती : 95.58 टक्के

नाशिक : 95.28 टक्के

लातूर : 95.27 टक्के

कोकण : 99.01 टक्के

दहावीचा निकाल कुठे पाहाल?

https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org/

follow us