मोठी बातमी : उत्सुकता शिगेला धडधड वाढली; उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल

Maharashtra SSC Result Date Announcement :  नुकत्याचा लागलेल्या बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर आत दहावीच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यानुसार बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षांचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून […]

SCC HSC Result

SSC HSC Exam Result

Maharashtra SSC Result Date Announcement :  नुकत्याचा लागलेल्या बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर आत दहावीच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यानुसार बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षांचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून निकालाची आतुरतेने वाट बघणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तर, निकाला काय लागले या विचाराने काहींची धाकधूकदेखील वाढली आहे.

निळवंडेचं पाणी सुटलं, आता श्रेयवादाची लढाई; जयंत पाटील म्हणाले, आघाडी सरकारने…

उद्या (2 जून) सकाळी 11 वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. मागच्या आठवड्यात बारावीच्या परिक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर सर्वांनाच दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता होती.

‘राजवाडा’ शब्दावरून पुण्यात राडा; भाजपला भिडायला निघालेल्या काँग्रेसच्या मावळ्यांना पोलिसांनी अडवलं

जुनच्या पहिल्या आठवड्यात दाहावीचा निकाल लागेल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर अखेर उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशांच्या कामाला वेग येणार आहे.  राज्यात 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती.

निळवंडेचं पाणी सुटलं, आता श्रेयवादाची लढाई; जयंत पाटील म्हणाले, आघाडी सरकारने…

दहावीचा निकाल कसा पाहाल?

दाहावीचा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी एकनंतर ऑनलाईन पाहता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थांना खाली लिंकवर जावे लागेल.

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in

Exit mobile version