सुनेत्रा पवारांचा दिल्लीश्वरांची झोप उडवणारा मास्टरस्ट्रोक; महाराष्ट्राच्या सारीपाटावर PK यांची एन्ट्री

PK ज्या 'चाणक्या'ने मोदींना दिल्ली जिंकवून दिली, ज्याने ममतांसाठी बंगालमध्ये भाजपचा अश्वमेध रोखला, तोच 'किंगमेकर' आता राष्ट्रवादीl आलाय.

सुनेत्रा पवारांचा दिल्लीश्वरांची झोप उडवणारा मास्टरस्ट्रोक; महाराष्ट्राच्या सारीपाटावर PK यांची एन्ट्री

सुनेत्रा पवारांचा दिल्लीश्वरांची झोप उडवणारा मास्टरस्ट्रोक; महाराष्ट्राच्या सारीपाटावर PK यांची एन्ट्री

Prashant Kishor Will Be The NCP New Political Strategist After Naresh Arora : महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर सर्वात मोठ्या भूकंपाची चाहूल लागलीय कारण, ज्या ‘चाणक्या’ने मोदींना दिल्ली जिंकवून दिली, ज्याने ममतांसाठी बंगालमध्ये भाजपचा अश्वमेध रोखला, तोच ‘किंगमेकर’ आता दादांच्या राष्ट्रवादीसाठी मदतीला धावून आलाय. होय, अजित पवारांच्या ‘घड्याळा’ला नवा वेग देण्यासाठी प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची एन्ट्री झालीये. ‘कमळा’ची गणिते चुकवण्यासाठी आणि दिल्लीश्वरांना महाराष्ट्राच्या मातीत घाम फोडण्यासाठी दादांनंतर सुनेत्रा पवार यांनी टाकलेलं हे सर्वात मोठं आणि सर्वात घातक अस्त्र मानलं जातंय. किशोर यांच्या राष्ट्रवादीतील एन्ट्रीनं आता महाराष्ट्रात ‘खेला होबे’ नाही, तर थेट ‘खेळ खल्लास’ होणार, अशी चिन्हं निर्माण झाली आहेत. नेमके प्रशांत किशोर कोण? त्यांनी आतापर्यंत कोण-कोणत्या पक्षांसाठी काम केलंय आणि त्यांचा सक्सेस रेट किती याबाबतचं लेट्सअपचं हे खास विश्लेषण…

पार्थ पवारांना पटेल अन् तटकरे का झालेत नकोसे?; राष्ट्रवादीतील संघर्षाची ‘इनसाईड स्टोरी’

दादांना गुलाबी ओळख देणारे अरोरा आऊट PK इन 

यापूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वीपर्यंत नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ ही कंपनी अजित पवार यांच्या पक्षाचे  ब्रँडिंग आणि रणनीती ठरवण्याचे काम करत होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बसलेल्या जबर धक्क्यानंतर अजितदादांना जनतेमध्ये ‘सॉफ्ट इमेज’सह सादर करण्याचे काम याच कंपनीने केले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर होताच अजित पवारांचे ‘गुलाबी जॅकेट’ आणि संपूर्ण महाराष्ट्रात फिरलेली ‘गुलाबी रथ मोहीम’ ही नरेश अरोरा यांचीच संकल्पना होती. या गुलाबी कॅम्पेनिंगमुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाले.

पण, आता ‘डिझाईन बॉक्स’ या प्रसिद्ध संस्थेशी करार संपल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसने आता थेट देशातील सर्वात मोठे आणि यशस्वी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर अर्थात PK यांच्याशी हातमिळवणी केली आहे. 16 मे 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची प्रदीर्घ बैठक पार पडली. ज्यात येथून पुढे प्रशांत किशोर राष्ट्रवादीची पुढील राजकीय रणनीती ठरवणार असल्याचे निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. येत्या दोन दिवसांत कायदेशीर सोपस्कर पूर्ण केल्यानंतर 1 जूनपासून प्रशांत किशोर यांची कंपनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा आणि रणनीती सांभाळणार आहे. पुढील 3 वर्षे पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने राष्ट्रवादीकडून थेट ‘निवडणुकीच्या चाणक्याला’ साद घातल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

तटकरे प्रदेशाध्यक्ष नाहीत, पटेल कार्याध्यक्ष नाहीत; राष्ट्रवादीत नक्की चाललय काय?

कोण आहेत प्रशांत किशोर? आणि त्यांचा ‘सक्सेस रेट’ काय?

प्रशांत किशोर (PK) हे भारतीय राजकीय वर्तुळातील असे नाव आहे ज्यांनी अनेक बुडत्या नौका किनाऱ्याला लावल्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात (UN) सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात 8 वर्षे काम केल्यानंतर त्यांनी भारतात राजकीय रणनीतीचे नवे पर्व सुरू केले. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘चाय पे चर्चा’ आणि ‘3D रॅली’ सारख्या संकल्पना राबवून त्यांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या पक्षांसाठी काम केले आणि त्यांचा राजकीय रणनीतीकार म्हणून सक्सेस रेट जवळपास 92 ते 95 टक्के राहिला आहे. त्यांनी 10-11 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या निवडणुका हाताळल्या आणि त्यापैकी केवळ एक किंवा दोन निवडणुकांमध्ये त्यांना अपयशाचा सामना करावा लागलाय. पश्चिम बंगालच्या 2021 च्या निवडणुकीनंतर त्यांनी औपचारिकपणे राजकीय सल्लागार  म्हणून काम करणे थांबवले आणि बिहारमध्ये ‘जन सुराज’ पक्षाद्वारे थेट राजकारणात सक्रिय झाले.

प्रशांत किशोर यांच्या एन्ट्रीमुळे राष्ट्रवादीला मोठे फायदे

डेटा-ड्रिव्हन राजकारण : प्रशांत किशोर हे प्रत्येक मतदारसंघातील जातीचे गणित, मतदारांचा कल आणि स्थानिक नाराजीचा अचूक डेटा काढण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे येथून पुढे फक्त ‘प्रशासक’ किंवा ‘प्रादेशिक नेते’ ही प्रतिमा बदलून दादांच्या पक्षाला व्यापक जनमानसाचे नेते म्हणून प्रोजेक्ट केले जाईल. त्याशिवाय पीके यांचा तरुण आणि तटस्थ मतदारांवर फोकस असतो. सोशल मीडिया आणि ग्राउंड लेव्हलच्या सर्वेक्षणांद्वारे पक्षाला नवीन मतदारांशी जोडण्यातही पीके यांच्यामुळे येत्याकाळात राष्ट्रवादीला फायदा होईल असे बोलले जात आहे.

जागावाटपात राष्ट्रवादीचा वरचष्मा वाढणार

आगामी 2029 च्या लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपात प्रशांत किशोर यांच्या डेटाचा वापर करून आमची या जागेवर ताकद जास्त आहे हे सर्वेक्षणाच्या आधारे सिद्ध करून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर राष्ट्रवादी दबावाचे राजकारण करू शकते. याशिवाय सध्या राज्यात शिंदे गटाचे मतदार आणि राष्ट्रवादीचे मतदार काही ठिकाणी आमनेसामने आहे. पीके यांच्या आक्रमक रणनीतीमुळे शिंदे गटाच्या पारंपरिक जागांवर राष्ट्रवादी हक्क सांगू शकते, ज्यामुळे शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतो.

शरद पवार शेवटचा डाव टाकणार! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार… पुण्यातल्या गुप्त बैठकीचं गुपित काय?

भाजप आणि शिंदेंच्या सेनेला ‘पीके’चा किती धोका?

प्रशांत किशोर यांच्या निवडीमुळे जरी राष्ट्रवादी पॉवर फुल होणार असली तरी, सध्या दादांची राष्ट्रवादी महायुतीत म्हणजे भाजप सेनेसोबत सत्तेत आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या एन्ट्रीने महायुतीमधील मित्रपक्ष भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या गोटात नक्कीच चिंतेचे वातावरण तयार होऊ शकते. कारण पीके हे कोणत्याही पक्षाला नंबर 2 वर ठेवण्यासाठी रणनीती आखत नाहीत, तर त्या पक्षाला नंबर 1 बनवण्यासाठी काम करतात.

भाजपच्या मायक्रो-मॅनेजमेंटला आव्हान

भाजप स्वतः निवडणुकीच्या मायक्रो-मॅनेजमेंटमध्ये माहीर आहे. पण आता त्यांच्याच सोबतीला असलेल्या राष्ट्रवादीकडे ‘पीकें’सारखा चाणक्य आल्यामुळे अंतर्गत स्पर्धा तीव्र होईल आणि भाजपला आपल्याच मित्राविरुद्ध सावध पावले टाकावी लागतील. थोडक्यात सांगायचे तर, अजितदादांच्या अकाली एक्झिटनंतर सुनेत्रा पवार यांनी प्रशांत किशोर यांच्या रूपाने महायुतीत राहूनही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आणि ताकद वाढवण्याचा ‘मास्टरस्ट्रोक’ खेळला आहे. उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता प्रशांत किशोर यांनी ज्या ज्या नेत्यांचा हात धरला, त्यांना सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी ठरले. यामुळेच भारतीय राजकारणात त्यांना ‘इलेक्शन गुरु’ किंवा ‘किंगमेकर’ म्हटले जाते.

स्वतःचा ‘जन सुराज’ पक्ष स्थापन करून नुकत्याच लढवलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत स्वतः थेट उमेदवार म्हणून उतरल्यावर त्यांना मोठा फटका बसला असला, तरी ‘पडद्यामागचे रणनीतिकार’ म्हणून त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आजही देशात सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे आता 1 जूनपासून सुरू होणारा ‘पीके पॅटर्न’ महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी कूस बदलून देतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Exit mobile version