Download App

Unseasonal Rain : पुढील तीन-चार तासांत गारपीटीसह मुसळधार पाऊस…

पुढील तीन ते चार तासांत उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामध्ये धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. तर कोल्हापूर, धुळे, औरंगाबादमध्ये गारपीटीचाही इशारा देण्यात आलाय.

आज दुपारच्यादरम्यान, हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार तासांत अवकाळीचे आगमन होणार आहे. यामध्ये मराठवाड्यासह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यासोबतच सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगलीतही अवकाळी पाउस बरसणार आहे.

Corona Alert : कोरोनावाढीवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर; दिले मॉक ड्रिलचे आदेश

एकीकडे राज्यात उन्हाचे चटके बसत असताना अचानक हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कालही राज्यातील काही भागांत पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मध्यांतरीचा काळ अवकाळी पाऊस मेहेरबान झाला मात्र, कालपासून पुन्हा एकदा ढग आल्याने काही भागांत सौम्य स्वरुपाचा पाऊस झालाय.

World Cup पात्रता फेरीत UAE च्या गोलंदाजाचा मजेशीर Video, पाहून हसू आवरेना

दरम्यान, आधीच शेतीपिकांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी अर्थिक संकटात आहे. त्यातच आता अवकाळी पाऊस येणार असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचं आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आलंय.

Tags

follow us