Narayan Rane : राणे आणि ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून यामध्ये वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह निलेश राणे आणि आमदार नितेश राणे हे देखील ठाकरे गटावर टीका करत असतात. ठाकरे गटाच्या नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जाते.
आताही ठाकरे गटाचे आमदार यांनी राणेवर टीका करत या वादात उडी घेतली आहे. आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्या मंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत नारायण राणे यांचे मंत्रिपद जाणार असल्याचे भाकित त्यांनी वर्तवलं आहे. हे भाकित नाही तर वस्तुस्थिती आहे असेही त्यांनी सांगितले.
Donald Trump : पॉर्नस्टार, पैसा आणि डोनाल्ड ट्रम्प; डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होणार? काय आहे प्रकरण
शिवसेनेवर टीका करण्याचे काम नारायण राणे यांच्याकडे होते ते काम आता संपले आहे त्यामुळे पुढील काही महिन्यांत त्यांचे मंत्रिपद जाणार आहे, असे नाईक यांनी सांगितले. नारायण राणे यांना माझ्या मतदारसंघात त्यांच्या मुलाला उभे करायचे आहे. पण लोकांचा कौल उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे. त्यांच्याकडून फक्त संभ्रम निर्माण केला जात असल्याची टीका त्यांनी राणे यांच्यावर केली.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना बरोबर घेत बंडखोरी केली. भाजपाच्या मदतीने सत्ताही स्थापन केली. आता मात्र शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरेंकडे येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर नाईक म्हणाले, शिंदे गटात गेलेले आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येण्यास तयार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर ते आमदार येतील असा दावा त्यांनी यावेळी केला.