Download App

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; महायुती अन् मविआ बंडखोरी कशी रोखणार?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत तिकिट कापल्याने नाराजी असल्याचं पाहण्यास मिळतं आहे.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Politics Live Updates Today : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबरला पार पडणार आहे. उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंमध्ये नाराजांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांना रोखणं आणि निवडणुकीला सामोरं जाणं हे दोहोंपुढचं मोठं आव्हान आहे. तसंच मनसे, वंचित बहुजन आघाडी, तिसरी आघाडी या सगळ्यांचा परिणाम कसा होतो ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

उमेदवारी न मिळाल्याने शिंदेंचे आमदार झाले बेपत्ता; 12 तासांपासून झाले नॉट रिचेबल, काय आहे प्रकरण?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत तिकिट कापल्याने नाराजी असल्याचं पाहण्यास मिळतं आहे. काँग्रेसमध्येही असाच सूर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी समंदर लौटके आयेगा और सबको साथ लेकर आयेगाची घोषणा दिली आहे. तर महाविकास आघाडीने महायुती सरकार उलथवण्याचा दावा केला आहे.

Tags

follow us