Download App

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? 20 तारखेला ‘मविआ’ घेणार मोठा निर्णय

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : लोकसभेनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीकडे (Maharashtra Vidhan Sabha Election

  • Written By: Last Updated:

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : लोकसभेनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीकडे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) लागले आहे. येत्या काही दिवसात निवडणूक आयोग (Election Commission) राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा देखील करणार आहे. त्यामुळे आतापासून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA)  निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार महाविकास आघाडीची 20 ऑगस्ट रोजी निवडणुकीच्या संदर्भात एक महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये जागावाटपाबाबत तसेच मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे (Congress) प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी याबाबत माहिती देत सांगतिले की, 20 ऑगस्ट रोजी राजीव गांधी यांची जयंती आहे. त्याच दिवशी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) मुंबईत येणार आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत चर्चा करणार आहे.

या बैठकीमध्ये विधानसभा निवडणूक आणि मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होईल. अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्याप्रमाणे लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवली होती, त्याप्रमाणे विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2024 मध्ये राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासून सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे.

Wayanad landslide च्या पीडितांसाठी अल्लू अर्जुनची मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केल्याने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राज्यात सरकार स्थापन करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us