Download App

कोण होणार राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष ? ; पाहा, कुणाच्या नावाला मिळाली सर्वाधिक पसंती

NCP Chief Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाला पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करत निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर पक्षाची कमान कुणाच्या हाती येणार याची चर्चा सुरू झाली आहे.

सध्या अध्यक्षपदासाठी खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत आहेत. पक्षाच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याच प्रश्नावर लेट्सअप मराठीने एक ऑनलाइन पोल घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे देणे योग्य ठरेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर हजारो लोकांनी आपली मते दिली.

Sharad Pawar Retairment : राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच राहणार? समितीने केला ठराव

जवळपास 55 हजार लोकांनी मते नोंदवली आहेत. या पोलमध्येही सुप्रिया सुळेच आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. जवळपास निम्म्या म्हणजे 50 टक्के लोकांनी सुळे यांनीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्हावे असे म्हटले आहे. तर अजित पवार यांच्या नावाला 28 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना 17 टक्के लोकांची पसंती मिळाली तर 4 टक्के लोकांनी अन्य नेत्यांना पसंती दिली आहे.

एकूणच या पोलवरून दिसत आहे की शरद पवार यांनी जर खरंच अध्यक्षपद सोडले तर त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीच पक्षाचे अध्यक्ष व्हावे, असे जास्तीत जास्त लोकांना वाटत आहे.

अजित पवार काय म्हणाले ?

दरम्यान, अध्यक्ष होण्याच्या प्रश्नावर काल अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. अध्यक्ष होण्याचा प्रश्नच येत नाही. मला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष केलं तरी मी पक्षाचा अध्यक्ष होणार नाही. मी त्या पदावर आजिबात काम करू शकत नाही. तसा विचार करण्याचााही प्रश्न निर्माण होत नाही, असे पवार म्हणाले होते.

Tags

follow us