महाराष्ट्र 59 वा वार्षिक निरंकारी संत समागम; भव्य शोभा यात्रेने झाला प्रारंभ

Nirankari Sant Samagam महाराष्ट्राच्या 59व्या वार्षिक निरंकारी संत समागमाला भव्य शोभा यात्रेने सुरुवात झाली.

Nirankari Sant Samagam

Nirankari Sant Samagam

Maharashtra’s 59th annual Nirankari Sant Samagam; begins with grand procession : महाराष्ट्राच्या 59व्या वार्षिक निरंकारी संत समागमाला भव्य शोभा यात्रेने सुरुवात झाली. सांगलीच्या सांगलवाडी येथे सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दिनांक 24 ते 26 जानेवारी दरम्यान संत समागमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कुठे थंडी कुठे पाऊस! राज्यातील थंडीची लाट ओसणार, हवामान विभागाचा अंदाज काय?

महाराष्ट्रसह देश विदेशातून लाखों भाविक भक्तगण  या संत समागमात सहभागी झाले आहेत. उपस्थित असलेल्या भाविकांसाठी आवश्यक सुविधा देखील समागम मैदानावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे भाविकांसाठी लंगरची व्यवस्था देखील 24 तास खुली राहणार असून, जेष्ठ नागरिक व  विकलांगासाठी   देखील विशेष व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्यात.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राहुल गांधींना तिसऱ्या रांगेत बसवलं; काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया

संत समागम स्थळी निरंकारी प्रदर्शनी, बाल प्रदर्शनी व प्रकाशन विभाग आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहेत. संत समागम मैदानावर दररोज सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून 27 जानेवारी रोजी सामूहिक विवाह सोहळा देखील याठिकाणी संपन्न होणार आहे. संत समागमाच्या पहिल्यादिवशी सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी  संपूर्ण मानवमात्राला मानवतेचा संदेश दिला.

Exit mobile version