मुंबई : भाजप-शिंदे गटाविरोधात आता महाविकास आघाडी सरकारने दंड थोपटले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात महाविकास आघाडी राज्यभरात संयुक्त सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यात आली आहे.
गुप्त चार मते कोणती? शिवाजी कर्डिलेंनी सांगितलं गणित…
राज्यात एकूण सहा ठिकाणी महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा पार पडणार आहे. या सभांना उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले मार्गदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेपूर्वी 15 मार्चला सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्याचा मेळावा पार पडणार आहे. हा मेळावा वाय. बी. सेंटरमध्ये होणार आहे. या मेळाव्यात सभांबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे.
महाविकास आघाडीच्या सभांची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून होणार असून 2 एप्रिलला संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे. या सभेला खुद्द उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Umesh Yadav पुन्हा झाला बाबा, पत्नी तान्या वाधवाने दिला गोंडस कन्येला जन्म
भाजप आणि शिंदे गटाला टक्कर देण्यासाठीच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ही रणनीती आखली जात असून याआधी कोकणात उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेनंतर आता राज्यातील प्रमुख जिल्ह्यांत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सभा घेण्यासाठी कंबर कसल्याचं दिसतंय.
कर्डिले अध्यक्ष झाले अन् घुलेंचे बॅनर उतरले
खेडच्या सभेनंतर उद्धव ठाकरे यांनी बळ मिळालं असून राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या मागे असल्याचा दावा मविआच्या नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान, नूकत्याच झालेल्या पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी एकसंघ लढले होते. त्यानंतर मविआच्या उमेदवाराचा विजय झाला.
आता राज्यात संयुक्त सभेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांविरोधात ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून ताकद लावली जात आहे. महाविकास आघाडीच्या या रणनीतीचा आगामी निवडणुकांमध्ये कितपत प्रभाव पडणार? हे आगामी निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.