Prithviraj Chavan : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election)महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi)मोठं यश मिळालं आहे. एकप्रकारे आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आपली तयारी सुरु केली आहे. त्यासाठी शनिवारी महाविकास आघाडीची अर्थात कॉंग्रेस(Congress), शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तिन्ही पक्षांची प्राथमिक बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये विधानसभा निवडणूक ताकदीने लढणार असल्याचे मविआकडून सांगण्यात आले. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस हा मोठा भाऊ ठरला, त्यामुळे कॉंग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक जागा मिळणार असा अंदाज व्यक्त केला जातोय, त्यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
भारताला धोक्याची घंटा! देशात प्रति व्यक्ती ‘इतकीच’ झाडे; पाकिस्तान, दुबईतही जमीन उजाड
यावेळी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस मोठा भाऊ ठरला आहे, त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात सर्वाधिक जागा कॉंग्रेस मागणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ-छोटा भाऊ असं काही चालणार नाही. प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून कोणत्या पक्षामध्ये चांगला उमेदवार आहे? त्याचबरोबर मागच्या निवडणुकीचा संदर्भ घेऊन जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल असे, त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
हा जागावाटपाचा निर्णय आम्ही लवकरात लवकर घेऊ आणि त्यासाठी आज आमची प्राथमिक बैठक झाली आहे. त्यामुळे बाकी काही वेगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही काही जाऊ नका, असं आवाहनही यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केले.
लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीला साथ दिली. धर्म जात हे राजकारण जनतेला पटलं नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्रात जे राजकारण यावेळी झालं ते दुर्दैवी होत असंही ते म्हणाले आहेत. मात्र, जनतेने जात, धर्म किंवा इतर फसव्या दाव्यांना नाकारून मतदान केलं असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. या निवडणुकीत आमचे तीन पक्ष असले तरी आमच्यासोबत अनेक छोटे मोठे पक्ष आणि काही संघटना आमच्यासोबत होते. त्यामुळे त्या सर्वांचेही यावेळी पृथ्वीराज जव्हाण यांनी आभार मानले. लोकसभा निवडणुकीत जनतेनं महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा दिला. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी यावेळी भाजपला चांगलाच धडा शिकवला आहे. या निवडणुकीत धार्मिक केंद्रीकरण करण्याचा प्रयत्नही करण्यात आला पण त्याचा काही फायदा झाला नाही, असेही यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.