महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर आता नागपूर आणि महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित केलेल्या सभेला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते सर्व नेते उपस्थित होते. 1 मेला महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची तिसरी सभा मुंबईत सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात पार पडला होता. याच मैदानात महाविकास आघाडी शक्तीप्रदर्शन करणार आहे.
कोर्लई गावच्या 19 बंगले प्रकरणात माजी सरपंचाला बेड्या, रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ?
महविकास आघाडीची तिसरी सभा मुंबई येथे होत असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच दुसरी सभा नागपूरमध्ये होणार आहे. 16 एप्रिलला नागपुरात वज्रमुठ सभा होणार आहे. नागपुरातील सभेसाठी दर्शन कॉलनी सद्भावना नगर येथील मैदानाची निवड करण्यात आली आहे. मात्र राजकीय सभेमुळे खेळाडूंची गैरसोय होईल असं कारण देत स्थानिक नागरिकांनी या मैदानावर सभा घेण्यास विरोध दर्शवला आहे.
राज्यभरात महाविकास आघाडीकडून एकूण 16 सभा घेतल्या जाणार आहेत. पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर आता 16 एप्रिलला नागपूर आणि महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे. त्याशिवाय येत्या काळात नाशिक, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत.