Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून जागावाटप जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 9, भाजप 7, शिवसेना शिंदे गट 7 आणि जनसुराज पक्ष दोन जांगावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.
जागावाटपाच्या निर्णयासाठी आज महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत जागावाटपावर एकमत झाल्याने चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. 8 ऑक्टोबर हा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने महायुतीमध्ये कोणता पक्ष किती जांगावर निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तर आता मंत्री पाटील यांनी मोठी घोषणा करत या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 9, भाजप 7, शिवसेना शिंदे गट 7 आणि जनसुराज पक्ष दोन जांगावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली आहे.
गोकुळ दूध संघ निवडणूक 2026
मतदान: 18 ऑक्टोबर 2026
मतमोजणी व निकाल: 19 ऑक्टोबर 2026
एकूण संचालक पदे: 25
मतदार: प्राथमिक दूध संस्थांचे सुमारे 5,331 प्रतिनिधी
उमेदवारी अर्ज: 15 ते 22 सप्टेंबर
अर्ज छाननी: 23 सप्टेंबर
वैध उमेदवारांची यादी: 24 सप्टेंबर
अर्ज माघारी: 25 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: 8 ऑक्टोबर
ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, दिल्लीत पुन्हा विरोधकांचे आंदोलन; राहुल – प्रियंका पोलिसांच्या ताब्यात
