Mahayuti retains dominance in Legislative Council elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत 17 पैकी 16 जागांवर बाजी मारली होती. 18 जून रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीपूर्वीच 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे उर्वरित 11 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडली. निकालात भाजपने सर्वाधिक 11 जागा जिंकल्या, तर शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागांवर विजय मिळवला.
मात्र नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला असून भाजपचे बंडखोर आणि अपेक्षा उमेदवार गोकुळ होते यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत विजय मिळवला. त्यामुळे नाशिकचा निकाल राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. महायुतीचा एकूणच निवडणुकीत बोलबाला पाहायला मिळाला, तर महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. ठाणे मतदारसंघातून रवींद्र फाटक, यवतमालमधून दृश्यांत चतुर्वेदी, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून अरुण लखानी आणि अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, भंडारा-गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर, सांगली-सातारामधून धैर्यशील कदम, परभणी-हिंगोलीमधून सईद खान, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, धाराशिव-लातूर-बीडमधून बसवराज पाटील, नागपूरमधून राजीव पोतदार, जळगावमधून नंदकिशोर महाजन, अमरावटींमधून प्रवीण पोटे आणि नांदेडमधून अमर राजूरकर यांनी विजय मिळवला.
नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव
या निवडणुकीत मतदानाचाही उच्चांक पाहायला मिळाला. नाशिक आणि भंडारा-गोंदिया येथे शंभर टक्के मतदान झाले. सांगली-सातारा येथे 99.89 टक्के, परभणी-हिंगोली येथे 99.78 टक्के, सोलापूरमध्ये 99.68 टक्के, धाराशिव-लातूर-बीडमध्ये 99.49 टक्के, छत्रपती संभाजीनगर-जालन्यात 98.90 टक्के, नागपुरात 98.44 टक्के, जळगावमध्ये 97.78 टक्के आणि अमरावतीमध्ये 94.68 टक्के मतदानाची नोंद झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी वैध मतांच्या 50 टक्के अधिक एक मतांचा कोटा निश्चित केला जातो. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये हा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते. यंदाच्या निकालाने महायुतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असले, तरी नाशिकमध्ये गोकुळ गिते यांच्या विजयाने महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीची चर्चा पुन्हा रंगली आहे. त्यामुळे दणदणीत विजयाच्या जल्लोषातही नाशिकचा निकाल महायुतीसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
