Download App

Malegaon Blast : निकालावर फडणवीसांची सर्वात छोटी पोस्ट; राजकीय वर्तुळातून काय उमटल्या प्रतिक्रिया?

  • Written By: Last Updated:

Politician Reaction On Malegaon Blast Case Verdict : मालेगावमधील भिक्खू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज (दि.31) जाहीर झाला. मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्णय जाहीर करत सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या निकालानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे. या निकालावर कुणी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया.

‘भगव्या’चा अपमान करणाऱ्यांना देव शिक्षा करेल! मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञा कडाडल्या

फडणवीसांची सर्वात छोटी प्रतिक्रिया

मालेगाव स्फोटाच्या निकालावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत छोटी पण बरच अचूक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ते त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात की, ‘दहशतवाद ना कधी भगवा होता, ना कधी राहणार’, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला होता – शिंदे 

फडणवीसांशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील निकालावर एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणतात की, सत्य कधी पराभूत होत नाही : सतरा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात कथित आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायाला उशीर झाला हे खरं आहे, पण सत्य कधीही पराजित होत नसतं, हे पुन्हा एकवार सिध्द झालंय. मालेगावच्या स्फोटांप्रकरणी खोटे आरोप करुन तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला होता. कारण आपली बाजू न्यायाची आहे, याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता.

कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आदी सात जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलाय. हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही. हिंदू कधीही देशविरोधी कृत्यं करु शकत नाही, कारण देशभक्ती हे हिंदूधर्मीयांसाठी धर्मकार्यच असतं. ‘हिंदू दहशतवाद’ नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी चलनात आणला. याच्यासारखा धादांत त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे? एक काळंकुट्ट पर्व आज संपलंय. हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला गेलाय. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा आता शंभरपट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल, यात शंका नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं! जय हिंद, जय महाराष्ट्र…

तुरूंगात 9 वर्ष छळ, 17 वर्षांनंतर अखेर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता; कोण आहेत कर्नल पुरोहित?

आता काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागायला हवी! – बावनकुळे

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश आहे. सर्व आरोपांमागे कोणताही ठोस पुरावा नाही, हे न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं. पण याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसनं जाणीवपूर्वक “हिंदू दहशतवाद” हा शब्दप्रयोग प्रचारात वापरत हिंदू समाजाला, श्रद्धेला, जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शतकानुशतकं मानवतेचं आणि सहिष्णुतेचं प्रतीक असलेल्या हिंदू धर्माला दहशतवाद्यांच्या रांगेत उभं करण्याचा अक्षम्य गुन्हा काँग्रेसने केला. आज कोर्टाने सत्य मांडलं, आता काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागायला हवी! हिंदू कधीच दहशतवादी नव्हता आणि नसेलही न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने हिंदूंना बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक मिळाली असल्याचे भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी एक्सवरील पोस्टवर म्हटले आहे.

धर्माचा आणि दहशतवादाचा संबंध नाही – अनिल देशमुख 

मालेगाव बॅाम्बस्फोटानंतर देशात ‘भगवा दहशतवाद’ या शब्दाची चर्चा झाली. याप्रकरणी सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली होती. मात्र भगवा आणि दहशतवादाचा काहीही संबंध नाही. धर्माचा आणि दहशतवादाचा एकमेकांशी संबंध नाही. दहशतवाद हा दहशतवाद असतो, असे स्पष्ट मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खरे आरोपी कोण? या प्रश्नावर याप्रकरणाच्या पुढील चौकशीतून खरे आरोपी कोण हे समोर येईल, असे अनिल देशमुख म्हणाले.

एक विधान अन् राजकारणातून पत्ता कट! साध्वी प्रज्ञा यांची राजकीय कारकीर्द कशी संपली? A टू Z स्टोरी…

निर्दोष मुक्तता ही ‘सत्यमेव जयते’ची जिवंत घोषणा – योगी आदित्यनाथ 

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता ही ‘सत्यमेव जयते’ची जिवंत घोषणा आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचे भारतविरोधी, न्यायविरोधी आणि सनातनविरोधी चारित्र्य उघड झाले आहे, ज्याने ‘भगवा दहशतवाद’ ही खोटी संज्ञा वापरून कोट्यवधी सनातन श्रद्धाळू, संत आणि राष्ट्रसेवकांची प्रतिमा मलिन करण्याचा गुन्हा केला आहे. काँग्रेसने त्यांचे अक्षम्य दुष्कृत्य जाहीरपणे स्वीकारावे आणि देशाची माफी मागावी असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

बॉम्बस्फोट झाला तर आरोपी गेले कुठे? – हर्षवर्धन सपकाळ

बॉम्बस्फोट झाला तर आरोपी गेले कुठे? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. जे दोषी असतील, ते पकडले गेले पाहिजेत. यासंदर्भात सरकार काय करणार? हादेखील प्रश्न आहेच. शहीद हेमंत करकरे यांनी या प्रकरणात जे काही धागेदोरे शोधले होते, त्यांचं काय झालं? या सरकारची ही जबाबदारी आहे की या स्फोटातील आरोपींना शिक्षा व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया : 

या खटल्यात अनेक साक्षीदारांनी कोर्टात साक्ष दिलेली नाही, ते फुटलेले आहेत. या खटल्याला लागल्याला विलंब, याप्रकरणात दोन वेगवेगळ्या एजन्सीजने काम केलंय. ज्यावेळी वेगवेगळ्या तपास यंत्रणा एखाद्या गुन्ह्याचा तपास करतात, तेव्हा त्यामध्ये मतभिन्नता असते. याचा परिणाम आरोपींना झाला, त्यांची मुक्तता झाली, अशी प्रतिक्रिया विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयावर दिली आहे.

नितेश राणे यांची प्रतिक्रिया 

हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही स्पष्ट बोलतो. हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. दुसऱ्याचा धर्म संपवून स्वत:चा धर्म वाढावा, असं कधीही करत नाही. काहींचे तोंड आज काळं झालं असेल, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल,  त्यांना चपराक मिळाली आहे. आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हिरवाच आहे. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि चिदंबरम हिंदू दहशतवाद यांनी हिंदू समाजाची आज माफी मागितली पाहिजे. कांग्रेस आणि पाकिस्तानची भाषा एकच दिसते, असं देखील नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

ज्यादिवशी करकरेंची हत्या झाली त्याच दिवशी या खटल्याचा निकाल लागलेला होता – आव्हाड 

जो काही न्याय दिला असेल त्याच्या विरोधात किंवा बाजूने बोलण्याचा मला अधिकार नाही.  ज्या दिवशी बॉम्ब ब्लास्ट मध्ये सर्व आरोपींना शोधलं आरडीएक्स कोणाच्या घरी होतं शोधून काढलं. आरडीएक्स आलं कुठून हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहिलाय 65 किलो आरडीएक्स आलं कुठून
* ज्या दिवशी हेमंत करकरे यांची हत्या झाली त्याच दिवशी या खटल्याचा निकाल लागलेला होता. आतंकवादाला जात धर्म रंग पंथ नसतो
* आतंकवादी आतंकवादी असतो कोणत्याही धर्माशी त्यांचा संबंध जोडू नये. हे उशिरा सुचलेले शहाणपण त्यांना आज सुचत असेल तर ठीक आहे देर आये दुरुस्त आये. हिंदू किंवा मुसलमान यांचा अतिरेकी कारवांशी संबंध नाही.

 

follow us