Download App

मुंबईत येणारच, लोकशाही मार्गाने आंदोलन करणार; उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मनोज जरांगे ठाम

Manoj Jarange On High Court Decision : मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहे. 29 ऑगस्टपासून मनोज

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange On High Court Decision : मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहे. 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईत मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणार आहे. त्यासाठी उद्या 27 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथून मुंबईसाठी निघणार आहे. मात्र त्यापूर्वी उच्च न्यायालयाने आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आणि 100 टक्के मुंबईत जाणार आणि आझाद मैदानावर उपोषण करणार असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

तर दुसरीकडे मुंबईतील उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. मात्र खारघर किंवा मुंबईतील इतर योग्य ठिकाणी आंदोलन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील मुंबईत कुठे आंदोलन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शंभर टक्के आंदोलन करणार

उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारकडे दोन कायदे आहेत का? न्यायदेवतेने जो निर्णय दिला आहे, तो आम्हाला मान्य आहे. त्यावर मला काहीच बोलायचे नाही मात्र, आमचे वकील या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागतील. आझाद मैदान का नाही? यावर न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशी आम्हाला खात्री आहे. असं माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“तीन लाख ट्रक काढतो अन् फडणवीसांचा बंगला भरून टाकतो”, ओएसडींना जरांगेंनी काय सांगितलं? 

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करत आम्ही मुंबईतील आंदोलन करणारच, सरकारला या आंदोलनाला परवानगी नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही. असं देखील माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.

follow us