Manoj Jarange issues a direct warning to Eknath Shinde over income tax probe into a relative : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित काही नेते, नातेवाईक आणि सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून छाननी होणार असल्याचे माहिती समोर आली आहे. यावर आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे यांनी थेट एकनाथ शिंदेंनाच इशारा दिला आहे.
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा…
मराठा आंदोलनाला कुणाचीही साथ मिळू नये, अशीच सरकारची भूमिका आहे का? आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकण्याची भूमिका घेतली जात आहे. मात्र सत्ता कायमची कुणाकडेच राहत नाही, हे सरकारनेही लक्षात ठेवावे. आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या परिस्थिती बदलू शकते.
ब्रेकिंग: भारताला सुवर्णपदक! महिला क्रिकेट संघाचा श्रीलंकेवर 147 धावांनी दणदणीत विजय
एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आमच्या सोबत उभे राहणे अपेक्षित होते. मात्र ते आंदोलनाला मदत करण्याऐवजी आंदोलकांविरोधात चौकशा लावण्याच्या भूमिकेत दिसत आहेत, ही बाब आमच्यासाठी नवीन नाही. आंदोलकांना वेगवेगळ्या प्रकरणांत अडकवण्याचे प्रयत्न त्यांनी करावेत; मात्र अशा कारवाईमुळे आमची भूमिका बदलणार नाही. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनातून आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही.
बारस्करांचे आरोप काय?
अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जरांगे पूर्वी महत्त्वाच्या चर्चा माध्यमांसमोर करण्याची भूमिका घेत होते. मात्र आता काही चर्चा बंद दाराआड होत असल्याचा दावा बारस्कर यांनी केला आहे. तसेच जरांगेंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून टेंडर मिळवल्याचा आणि आर्थिक लाभ मिळवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, बारस्कर यांनी सप्टेंबरमध्ये जरांगे यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत ईडीकडे तक्रार केल्याचेही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आयकर विभाग चौकशी करत आहे, अशी चर्चा आता व्हायला लागली आहे.
