अंतरवालीतील व्यासपीठ का हटवलं? दुष्काळाच्या GR वरून मुंबई आंदोलनापर्यंत; जरांगे स्पष्टच बोलले

Manoj Jarange on Drought, Maratha; मनोज जरांगे यांनी दुष्काळ GR, अंतरवालीतील स्टेज आणि मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर भूमिका स्पष्ट केली

Manoj Jarange on Drought GR and Maratha Reservation

Manoj Jarange on Drought GR and Maratha Reservation

Manoj Jarange on Drought GR and Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा आणि राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. अंतरवाली सराटीतील आंदोलनाचं स्टेज का हटवण्यात आलं, सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळाच्या GR वर जरांगेंची नेमकी काय भूमिका आहे आणि मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मुंबईकडे आंदोलन नेण्याचा इशारा त्यांनी का दिला, याबाबत जरांगे यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

तब्बल तीन वर्षांनंतर जरांगेंचा उपोषण स्थळावरील मंडप हटवला; ग्रामस्थ अन् सरपंचांमध्ये रात्री काय घडलं?

‘किमान हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळायला हवी’

राज्य सरकारने दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या भागांसाठी दुष्काळ जाहीर केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासोबतच आर्थिक अनुदान द्यावे. प्रत्येक शेतकऱ्याला किमान हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळायला हवी, अशी मागणी जरांगे यांनी केली.

जरांगे म्हणाले की, दुष्काळ जाहीर करणे हा केवळ सुरुवातीचा निर्णय असून, त्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळणे महत्त्वाचे आहे. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी सरकारने सरसकट कर्जमाफी आणि पुरेसे अनुदान द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

अंतरवालीतील आंदोलन स्थगित; आता पाटोद्यापासून मुंबईकडे जाण्याचा इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथील आंदोलन स्थगित केल्याचे स्पष्ट केले. अंतरवालीतील हे शेवटचे आंदोलन असल्याने व्यासपीठ काढून टाकण्यास सांगण्यात आले. यापुढे अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग- राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

आता पुढील आंदोलनाची दिशा पाटोदा येथून मुंबईकडे असेल, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. पाटोदा येथे सरकारने तीन महिन्यांचा वेळ मागितला आहे. या कालावधीत मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पाटोद्यापासून मुंबईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

‘तीन महिने सरकारला काय करायचं ते करू द्या’

ईडी चौकशीच्या मुद्द्यावरही मनोज जरांगे यांनी भाष्य केले. आपल्या सहकाऱ्यांची ईडी चौकशी होऊ द्यावी, त्यांना जेलमध्ये जावे लागले तरी चालेल, असे ते म्हणाले. मराठा आंदोलनाशी संबंधित व्यक्तींची चौकशी होत असल्याचा दावा करत त्यांनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला असल्याचे सांगितले.

“माझ्या सहकाऱ्यांची ईडी चौकशी होऊ द्या, त्यांना जेलमध्ये जाऊ द्या. देशात पहिल्यांदाच मराठा आंदोलकाची चौकशी होत आहे. सरकारला तीन महिने काय करायचं ते करू द्या. त्यानंतर आम्हीही सोडणार नाही.”

बँक ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या रविवार असूनही बँका सुरू; सोमवारपासून 3 दिवसांचा संप, आजच उरकून घ्या बँकेची कामं

असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. त्यामुळे आगामी तीन महिन्यांत सरकार मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर कोणती पावले उचलते आणि त्यानंतर जरांगे आंदोलनाची पुढील दिशा काय ठरवतात, याकडे लक्ष लागले आहे.

Exit mobile version