मनोज जरांगेंनी रुग्णालयातूनच घेतला मोठा निर्णय; उद्या अंतरवाली सराटीत मराठा अभ्यासकांची बैठक

Manoj Jarange रुग्णालयातून मनोज जरांगेंनी 16 ऑगस्टला अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण अभ्यासकांची बैठक बोलावली.

Manoj Jarange

Manoj Jarange

Manoj Jarange Patil to Meet Maratha Reservation Experts Tomorrow : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशक्तपणा, ताप आणि थंडीचा त्रास जाणवत असल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, प्रकृती अस्वस्थ असतानाही जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या पुढील लढ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

16 ऑगस्टला अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण अभ्यासकांची बैठक

मराठा आरक्षणाच्या कायदेशीर, ऐतिहासिक आणि सामाजिक बाबींचा सखोल अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना मनोज जरांगे पाटील यांनी 16 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत चर्चेसाठी बोलावले आहे. ही बैठक रविवारी दुपारी 12 वाजता होणार असल्याची माहिती त्यांचे सहकारी गंगाधर कळकुटे पाटील यांनी दिली आहे.

“त्यांना रॉचे अध्यक्ष करायला पाहिजे”; सिस्पे घोटाळ्यावरून सुजय विखेंचा निलेश लंकेंना टोला

विशेष म्हणजे, रुग्णालयात उपचार घेत असतानाही स्वतः जरांगे पाटील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी ते काही काळासाठी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन अंतरवाली सराटीत येण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाच्या पुढील दिशेवर होणार चर्चा

या बैठकीत मराठा आरक्षणाच्या लढ्याची पुढील दिशा काय असावी, यासह आरक्षणासंदर्भातील कायदेशीर आणि ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास केला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीकडे मराठा आरक्षण आंदोलनाच्या पुढील रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

IND vs SL : पहिला दिवस भारताच्या नावावर, पडिक्कलचे शानदार शतक; श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडला घाम

महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा सखोल अभ्यास करणाऱ्या सर्व अभ्यासकांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन गंगाधर कळकुटे पाटील यांनी केले आहे.

प्रकृती अस्वस्थ असतानाही जरांगे मैदानात

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठका घेतल्या. विविध ठिकाणी कार्यकर्ते आणि समाजबांधवांशी संवाद साधताना त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य सरकारवरही टीका केली होती.

धीरज परदेशी प्रकरणात पोलीस अधीक्षकांचे मोठे विधान; म्हणाले आरोपींना…

आता प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात उपचार सुरू असतानाही जरांगे पाटील यांनी अभ्यासकांची बैठक बोलावल्याने त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 16 ऑगस्टच्या बैठकीत नेमकी कोणती रणनीती ठरते आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला कोणती नवी दिशा मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version