Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी आक्रमक झाले. गेल्या आठवड्यात सुरू केलेलं उपोषण त्यांनी तूर्तास स्थगित करत 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला. 13 जुलैपर्यंत आरक्षण न दिल्यास सरकारला जड जाईल असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, आता पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. छगन भुजबळांना बैलाचं इंजेक्शन द्यावं लागेल, असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं.
राज्यातील बेरोजगाराची वास्तव ! पोलिस भरतीत एकापदासाठी तब्बल एक हजार तरुणांचे अर्ज
ज्या कुणबी नोंदी आजवर मिळाल्या, त्या बोगस आहेत, अशी टीका भुजबळांनी केली होती. याविषयी विचारलं असता जरांगे म्हणाले की, संविधानाच्या पदावर बसूनही भुजबळांना कळत नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी सगळ्यांना वेड्यात काढलं. मी हैदराबाद गॅझेट आणलं. 1884 ची जनगणना आहे. यामध्ये संपूर्ण मराठा समाज कुणबी आहे. भुजबळांनी ओबीसी आणि मराठा यांच्यात झुंज लावली, अशी टीका जरांगेंनी केली.
ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही, सिध्द करा; पंकजा मुंडेंचं सरकारला आव्हान
तुम्ही नाही दिलं तरीही आम्ही ओबीसीत जाणार आहोत. मराठा आणि कुणबी एक आहेत हे सिद्ध झाले. आमच्याकडे नोंदी आहेत, असंही जरांगे म्हणाले.
पुढं बोलतांना जरांगे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. भुजबळ बधिर झालेत. त्यांना काही दिवसांनी बैलाच्या गोळ्या द्याव्या लागतील. मोठे इंजेक्शन द्यावे लागेल. त्यांनी सर्वात जास्त ओबीसींच वाटोळं केलं, अशी टीका जरांगेंनी केली.
मराठा आणि धनगरांनी शहाणे झाले पाहिजे. या संधीचा सोनं केलं पाहिजे. धनगर, मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आले तरच सत्ता काबीज करता येईल. एसटी आरक्षणाला एवढी ताकद लावली असती तर आतापर्यंत आरक्षण मिळालं असतं. त्यामुळे नेत्यांचे ऐकू नका. कदाचित एक-दोन वर्षांनी धनगर बांधवांनी एसटीत आरक्षण मागायचे ठरवले असेल तर ते मिळू शकते, असंही जरांगे म्हणाले.