असला जज असतो का? आपलं जमत नाही उठा, निघा; आंतरवालीत हाय होल्टेज ड्रामा अन् जरांगे-विखेंची जुगलबंदी

Manoj Jarange Scolded Minister Vikhe मनोज जरांगे यांना मंत्री विखे यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं.

Radhakishna Vikhe Patil Manoj Jarange

Radhakishna Vikhe Patil Manoj Jarange

Manoj Jarange Scolded Minister Vikhe on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन छेडणारे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत मोठी घोषणा केली आहे. येत्या 30 मे पासून आपण कडक आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं.

अजितदादांच्या कल्पक, कार्यक्षम कार्याला आदरांजली; बारामती बसस्थानकाला प्रथम क्रमांकाचं 1 कोटींचं बक्षीस

मात्र जरांगे हे मराठा समाजाच्या शिंदे समितीच्या कुणबी नोंदींवरून संतप्त होत त्यांनी उपोषणाचा निर्धार कायम ठेवला आहे. मात्र यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विखे आणि जरांगेंमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये जरांगे हे विखेंना कुणबी नोंदी आणि प्रमामपत्र का मिळत नाहीत यावर विचारत होते मात्र विखेंना उत्तर देता न येताच ते थेट फाईल्स काढून त्यांना हजरजबाबी उत्तर देत अक्षरश: विखेंना तोंडघशी पाडत होते.

जरांगे-विखेंची जुगलबंदी…

आमच्या आंदोलकांनापासून राज्यात किती नोंदी सापडल्या? – जरांगे

शिंदे समितीला 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. – विखे

57 लाख 41 हजार नोंदी सापडल्याचा रेकॉर्ड सरकारने आम्हाला दिलेला आहे. – जरांगे

मी उपोषण करणार,तुमचं माझं जमणार नाही. – जरांगे

एका नावावर अनेक नोंदी असू शकतात. – विखे

मी 58 लाखांपैकी किती लोकांना दाखले दिले याची यादी देतो. विखे

मी तुमची समजूत काढण्यापुरतं कधीही बोलत नाही, गैरसमज ठेऊ नका. – विखे

ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलीडिटी द्या, अधिकारी प्रमाणपत्र देखील देत नाही. – जरांगे
काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र नाकारले हे मी नाकारत नाही. – विखे

तुमच्यापासून कोणतीही माहिती लपवली जाणार नाही, तालुकानिहाय,जिल्हानिहाय माहिती दिली जाईल,तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. – विखे

प्रस्ताव तयार आहे. हैद्राबाद गॅझेटचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेले आहे. याबाबतचा निर्णय अजून आलेला नाही. त्यामुळे सातारा गॅझेट अजून लागू करू शकलो नाही – जरांगे

औंध संस्थानचीही आपली तयारी आहे. – विखे

लाड तुम्ही राजीनामा देऊ नका, फक्त माझ्यासोबत उपोषणाला बसा- जरांगे यांची लाड यांच्याकडे मागणी

महाविकास आघाडीने धोका दिला, म्हणून तुम्हाला निवडून दिले आता तुम्ही आरक्षण द्या. – जरांगे यांची विखे यांच्याकडे मागणी

10 महिन्यात सरकारने आमच्या कोणताही मागण्या पूर्ण केल्या नाहीत. – जरांगे

मुख्यमंत्री कार्यालयाने प्रमाणपत्रे वाटप थांबवले, फडणवीस यांना विरोध करण्याची हिंमत कुणाची? -जरांगे

एकदा मराठ्यांना आरक्षण देऊन बघा. – जरांगे

आता यंदा 50-60 लाख पोरांचे अँड मिशन अडकतील. -जरांगे,

एवढे पोरं नाहीत. – विखे

आमची जात कोणती हेच आम्हाला समजेना. – जरांगे

जरांगे लाडांना म्हणाले, तुम्हाला मी आरक्षण शिकवतो. – जरांगे

लाड आणि मी दोघांनी कुस्ती केलेली आहे, मी त्यांना 25 वेळा धुवून काढला. – जरांगे

1994,चा जीआर, आणि मंडल आयोग चॅलेंज होऊ शकतो. – जरांगे

इंदिरा साहनी जजमेंट मुले अनेक अडचणी आहेत. – जरांगे

सातारा संस्थानचा जीआर काढा. – जरांगे

फडणवीस यांनी आदेश दिल्यास उद्यापासूनच हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप सुरु होतील. – जरांगे

एका महिन्यात हैद्राबाद गॅझेटनुसार जात प्रमाणपत्र सगळ्यांना देणार हे फडणवीसांनी लेखी द्यावे. – जरांगे

आमच्यावरील गुन्हे मागे घेऊ नका, पण आम्हाला मारहाण करणाऱ्या दीडशे पोलिसांवर गुन्हे दाखल करा, चालू द्या प्रकरण कोर्टात. – जरांगे

आम्ही तुमच्या भावनेचा आदर करतो. – विखे

 

Exit mobile version