Manoj Jarange Warn to Rupali Chakankar on Vaishnvi Hagvane Death Case : बहुचर्चित पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Case) फरार आरोपी सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशिल हगवणे (Sushil Hagawane) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान या प्रकरणावर राजकारणासह सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. वैष्णवीच्या माहेरी म्हणजे कस्पटे कुटुंबाची नेत्यांकडून भेट घेतली जात आहे. त्यात आज मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी यांनी कस्पटे म्हणजे वैष्णवीच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना इशारा दिला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
महिला आयोगाने महिलांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजे. हा आयोग त्यासाठीच नेमलेला आहे. मात्र या न्यायाच्या मंदिरातच महिलांवर अन्याय होणार असतील तर तो महिला आयोग बरखास्त केलेला बरा. त्यामुळे इथून पुढच्या काळात महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार आली. तर त्यावर महिला आयोगाने तात्काळ कारवाई केली पाहिजे. अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्या पाहिजे.अन्यथा त्यांच्या विरोधात देखील आम्ही सुरू होऊ. असं म्हणत एक प्रकारे मनोज जरांगे यांनी रूपाली चाकणकर यांना थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वैष्णवीला दिलेली फॉर्च्युनर ते चांदीचे भांडे हगवणेंकडून काय-काय जप्त; पोलिस अधिकाऱ्याने यादीच वाचली
पदरात 9 महिन्यांचं बाळ असलेल्या वैष्णवीने सासरच्या लोकांच्या छळाला, मारहाणीला, पैशांच्या मागणीला कंटाळून गेल्या आठवड्यात तिचं जीवन संपवलं. याप्रकरणामुळे राज्यभरातील नागरीक संतापले आहेत. (Vaishnavi) याप्रकरणात फरार असलेले वैष्णवीचे सासरे आणि दीर यांना अटक झाली. तिचे पती, नणंद आणि सासू आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं.
मोठी बातमी! पुण्यात अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू
वैष्णवी हगवणे हिच्या जाऊबाईने जेव्हा तक्रार दिली तेव्हा जर महिला आयोगाने दखल घेतली असती तर वैष्णवीचा जीव वाचला असता असं म्हणत रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावरच गन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसंच, यावर बोलताना रोहिणी खडसे यांच्या पीएची माझ्याकडं तक्रार आली आहे. त्यामुळे ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे त्यांनी दुसऱ्यावर बोलू नये. आम्ही आमच्या स्वकर्तृत्वाने इतपर्यंत आलो आहेत असा पलटवार रुपाली चाकणकर यांनी केला.