फडणवीस सरकारने दादागिरी करू नये, अन्यथा… मुंबई आंदोलनावरून जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange warns government दक्षिण मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.

Jarange Fadanvis

Jarange Fadanvis

Manoj Jarange warns government regarding Mumbai protest Fadnavis government should not resort to high-handed tactics : दक्षिण मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. आझाद मैदानाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चाला मनाई करण्याच्या निर्णयाचा जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दांत विरोध केला आहे. मराठा समाज मुंबईत येणार असल्यामुळेच सरकारने हे नवे नियम लागू केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा मुंबईत आंदोलन करणारच, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

MPSC पेपर फुटीबाबत तपासात धक्कादायक माहिती समोर; परीक्षेच्या 2-3 दिवस आधीच पेपरफुटल्याच निष्पन्न

मुंबईतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या नव्या नियमांवरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. जनतेने आणि विशेषतः मराठा समाजाने सरकारला सत्तेवर बसवलं, मात्र त्याच समाजाला मुंबईत येण्यापासून रोखलं जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.आंदोलनासाठी सरकारने परवानगी द्यावी, आम्ही कायद्याचा सन्मान करतो; मात्र परवानगी नाकारली तरी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. मुंबईतील नागरिकांनी काही दिवस आम्हाला सांभाळून घ्यावं. आमच्या मागण्या मान्य झाल्या तर मुंबईत येण्याची गरजच भासणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Video एक बिस्किट्स घेऊ? समय रैनाच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर अन् एकच हशा पिकला

फडणवीस सरकारने दादागिरी करू नये, असा इशारा देत जरांगे पाटील यांनी आझाद मैदानासह मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला. “मराठे मुंबईत जाणार आहेत, त्यामुळे मुद्दामून सरकारने हे केलं. यात झाकून ठेवण्यासारखं काहीच नाही… आम्ही कायद्याचा सन्मान करतो. आम्ही तुम्हाला परवानगीचा अर्ज दिला आहे. तुम्ही परवानगी द्या, नाहीतर नका देऊ.”

नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील 10 महिला पर्यटक सुरक्षित; प्रशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी

दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत आंदोलन होणार असल्याचं जरांगे पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केलं. त्यानंतर मुंबई आंदोलनाची तारीख ठरल्यानंतर मराठा समाजाने सज्ज राहावं, वाहनांना किक मारून मुंबईच्या दिशेने निघावं आणि जिंकूनच परत यायचं, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.मुंबईत मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी होणार असल्याचा दावा करत जरांगे पाटील यांनी सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी केली आहे.

 

 

Exit mobile version