तू एका बापाचा असशील तर मला मारायला ये…, मनोज जरांगे यांच धनंजय मुंडेंना आव्हान

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगवर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना थेट आव्हान दिलं आहे.

Untitled Design (374)

Untitled Design (374)

Manoj Jarange’s challenge to Dhananjay Munde : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपल्या कथित घातपात प्रकरणासंदर्भात आज जालन्याच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी गंभीर आरोप करत थेट नार्को टेस्टची मागणी केली आहे. मनोज जरांगे यांनी सांगितले की, घातपात प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खुणे याने न्यायालयात अर्ज दाखल करत स्वतःसह जरांगे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. यामुळे अर्ज मंजूर करून न्यायालयासमोर सादर करण्यात यावा, अशी मागणी जरांगे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, धनंजय मुंडे, अमोल खुणे आणि माझ्यासह एकूण पाच जणांची नार्को टेस्ट करा. सत्य बाहेर आलंच पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. यावेळी जरांगे यांनी अमोल खुणेवर देखील गंभीर आरोप केले आहेत. ‘अमोल खुणे हा काही धुतल्या तांदळाचा नाही. त्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन धनंजय मुंडेंनी माझ्या घातपाताचा कट रचला’ असा थेट आरोप जरांगेंनी केला.

दहा पक्ष बदलणारा मला भाजपमध्ये जाण्याचा सल्ला देतोय; जयंत पाटील यांचे सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर

त्याचप्रमाणे, आपल्या जीवाला धोका असल्याचं मान्य करत असतानाच, ‘माझी सुरक्षा व्यवस्था काढून घ्या’ अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. ‘माझा घातपात करायला परळीच्या छक्क्याला मोकळं मैदान पाहिजे म्हणूनच माझी सुरक्षा काढून घ्यायला सांगतोय’ असं वादग्रस्त वक्तव्य यावेळी त्यांनी केलं. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगवर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना थेट आव्हान दिलं आहे.

‘तू एका बापाचा असशील तर मला मारायला ये, क्षत्रिय मराठा काय असतो ते दाखवतो. तुझं बोट सुद्धा परत जाऊ देणार नाही’ असा इशारा त्यांनी दिला आहे. याशिवाय, घातपात प्रकरणातील सर्व आरोपींचा जामीन रद्द करून पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version