Download App

राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक

  • Written By: Last Updated:

Manoj Saunik appointed as Chief Secretary of the State : राज्याच्या वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव 30 एप्रिला ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची जागी सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक हे 30 एप्रिल पदाचा कार्यभार हाती घेणार आहेत.

तसेच पुढील आदेश येईपर्यंत मनोज सौनिक त्यांच्याकडे मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग आणि अतिरिक्त कारभार म्हणून असलेल्या अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिरिक्त कारभार असणार आहे.

मनोज सैनिक याना सहा महिन्याचा कार्यकाळ मिळेल. त्यानंतर डॉ. नितीन करीर हे तीन महिने साठी मुख्य सचिव होऊ शकतात. गेल्या काही मुख्य सचिव यांच्या प्रमाणे करीर यांना मुदतवाढ मिळू शकते. त्यानंतर सुजाता सौनिक या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होतील का? याकडे ही सर्वांचे लक्ष असेल. सुजाता सौनिक या सध्या सर्वात ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत. यापूर्वी चंद्रा अय्यंगार आणि सौ गाडगीळ यांना संधी असून देखील मुख्य सचिव होता आले नव्हते.

WhatsApp Image 2023 04 28 At 6.22.35 PM

Tags

follow us