Download App

Jalna Maratha Aandolan Video : जालन्यातील आंदोलनाला हिंसक वळण, लाठीचार्च केल्यानं आंदोलकांकडून दगडफेक, दोन बसही पेटवल्या

  • Written By: Last Updated:

Jalna Maratha Aandolan : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation Demands) गेल्या ५ दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी (Antarvali Sarati) गावात मराठा समाजाचं उपोषण सुरू होतं. या उपोषणासाठी आज शेकडो लोक जमले होते. मात्र, आंदोलकांना उपोषणासाठी विरोध करत सायंकाळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमुळे (stone throwing) लाठीचार्ज करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी शेकडो मराठा आंदोलकांवर लाठीमार केला आणि जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या लाठीचार्जनंतर जालन्यात एकच गोंधळ उडाला आहे. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. मराठा उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात राज्यभरात संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर आंदोलक आता आक्रमक झाले आहेत. या आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर दोन बसेस पेटवून दिल्या आहेत. त्यामुळे अंतरवली सराटी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वेळापूर्वी पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये वाद झाल्याचंही सांगितल्या जातं आहे. उपोषणकर्त्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला तेथून चार किलोमीटर अंतरावर आंदोलकांनी दोन बसेस पेटवून दिल्या. याशिवाय काही वाहनांवर दगडफेकही करण्यात आली आहे. आंदोलकांनी खासगी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बस पेटवून दिल्या.

दरम्यान, एका वृत्त वाहिनीनं काही स्थानिक लोकांशी चर्चा केली. त्यावेळी एका गावकऱ्याने सांगितले की, आंदोलक घोषणाबाजी करत आहेत आणि त्यांच्या काही आंदोलकांना पकडून नेलं, असं म्हणत होते. या आंदोलकांनी आधी प्रवाशांना बसमधून खाली उतरवले आणि नंतर बस पेटवून दिली. तोंडाला रुमाल बांधलेले आंदोलक घटनास्थळी दिसत होते.

जालन्यात मराठा उपोषण आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जनंतर आता राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहे. जालन्यातील आंदोलन अमानुष पद्धतीनं मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा तीव्र निषेध करत मराठा आरक्षण प्रकरणी सरकारनं समाजाचा अंत पाहू नये असा इशारा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिला आहे. तर गृहखात्याकडून घेतलेली भूमिका ही अतिरेकी भूमिका असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. जालन्यात झालेल्या या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे

विरोधकांकडून सरकारवर टीका
जालन्यात मराठा उपोषणातील आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. जालन्यातील आंदोलन अमानुष पद्धतीने दडपण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने समाजाचा अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. गृहमंत्रालयाने घेतलेली भूमिता ही अतिरेकी भूमिका असल्याची टीका शरद पवार यांनी केली. तर मराठा आंदोलकांवर लाठीमार करणारे सरकार आम्हाला नको आहे, असे विधान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे.

यावर भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जेव्हा अशी घटना घडते, तेव्हा त्यांचं खातेवाटप सुरू होतं. त्यांच्याकडे फार गंभीरतने पाहू नये. सरकार थोडीच लाठीचार्जचे आदेश देते.

Tags

follow us