Download App

‘साखळी उपोषण सुरूच राहणार; विश्वासघात केला तर नाड्या आवळू’; मनोज जरांगेंनी ठणकावून सांगितलं

  • Written By: Last Updated:

Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी शिष्टमंडळाने जरांगे पाटलांना आणखी काही वेळ मागितला. यावेळी जरांगेंनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणार असाल तर वेळ देण्यास हरकत नाही, असं सांगितलं. अखेर त्यांनी आरक्षण देण्यासाठी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत दिली. मात्र साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. वेळ घ्या, पण सरसकट आरक्षण द्या, असंही ते म्हणाले.

Maratha Reservation : दगाफटका केल्यास नेत्यांना मुंबईचे दरवाजे बंद! जरांगेंचा सर्वपक्षीयांना इशारा 

जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरपर्यंत वेळ देण्याची तयारी दर्शवली. मात्र, शिष्टमंळाने 2 जानेवारीपर्यंत वेळ मागितला. धनंजय मुंडे यांनी विनंती करत वेळ मागितल्यानं जरागेंनी 2 जानेवारीपर्यंत मुदत दिली. यावेळी जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची सरकारची तयारी आहे. मराठवाड्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे. पण उर्वरित महाराष्ट्राचे काय? आमच्या बांधवांनाही आरक्षण मिळाले पाहिजे. सर्वांची दिवाळी गोड झाली पाहिजे. त्यामुळे सरकारला आणखी काही वेळ दिला, असं जरांगे म्हणाले.

आरक्षण न्यायालयातही टिकावं यासाठी या समितीला वेळ दिला पाहिजे. हा लढा मोठा आहे. त्यामुळे मी सरकारला वेळ देण्याचा निर्णय घेतला. पस्तीस वर्षे आरक्षण नसताना काय केले? काही नाहीय पिढ्यानपिढ्या मराठा जातीवर अन्याय होत आहे. आताही मराठ्यांना आरक्षण मिळत असल्याने सरकारला आणखी वेळ देण्याचा निर्णय थोडा वेळ देऊ. आणखी थोडा वेळ दिल्यानं काही फरक पडत नाही. मात्र, आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, असं जरांगे म्हणाले.

यावेळी मंत्री उदय सामंत, संदीपाम भुमेर, बच्चू कडू, धनंजय मुंडे यांचं शिष्टमंडळ अंतरवलीत हजर होत.

ते म्हणाले, उपोषण मागे घेतलं तरी साखळी उपोषण सुरूच राहणार. आपल्याला आंदोलनाची दिशा बदलायची आहे. तालुका, जिल्हा, गावपातळीवर जाऊन व्यापक आंदोलन करायचं. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी माझ्या घराचा उंबरठाही ओलांडणार नाही. मी मराठ्यांचा अपमान होऊ देणार नाही. लेकरायची शपथ घेऊन सांगतो, सरकारच्या बाजूनं जाणार नाही, असंही जरांगेंनी स्पष्ट केलं.

सरकारने दगाफटका केला तर त्यांच्या नाड्या आवळू. त्यांच्या र्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक नाड्या आवळू.. थेट मुंबईत जाऊन बसायचं… त्यांना भाजीही द्यायची नाही. त्यामुळं दगाफटका बसला तर आत्तापासूनच तयार राहा, असंही जरांगे म्हणाले.

Tags

follow us